नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या एकूण ३४ हजार ३४९ मतदारांपैकी सर्वाधिक १३४२० मतदार नागपूर जिल्ह्यातील असल्याने त्यांचाच कौल या मतदारसंघातील नवीन शिक्षक आमदार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा नागपूर केंद्रित होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षक मतदारसंघातील सहा जिल्ह्यांत एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. त्यापैकी ३४ हजार ३४९ मतदारांनी (८६.२६) मतदान केले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यात मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या १३,४२० (एकूण मतदानाच्या ४७ टक्के) आहे, तर इतर पाच जिल्ह्यांत मिळून मतदार करणाऱ्यांची संख्या २०,८८९ आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण १६ हजार ४८० पैकी १३४२० (८१.४३ टक्के) मतदारांनी मतदान केले. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार २११ पैकी २९३९ मतदानारांनी (९१.५३ टक्के), भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ७९७ पैकी ३३८५ (८९.१५) मतदारांनी, गोंदिया जिल्ह्यात ३ हजार ८८१ पैकी ३३९९ (८७.५८ टक्के) मतदारांनी, चंद्रपूर जिल्ह्यात ७ हजार ५७१ पैकी ६९५७ (९१.८९) मतदारांनी, तर वर्धा जिल्ह्यात एकूण ४ हजार ८९४ पैकी ४२४९ (८६.८२ टक्के) मतदारांनी मतदान कले. मतदानाच्या टक्केवारीत नागपूर जिल्हा (८१.४३ टक्के) इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात मागे असला तरी मतदान करणाऱ्यांची संख्या या जिल्ह्यात अधिक आहे. मतदारसंख्या (१६ हजार ४८०) सर्वाधिक असल्याने मतदानाची टक्केवारी कमी दिसून येते.

हेही वाचा – नागपूर : ॲड. सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन फेटाळला

शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित नागोराव गाणार, मविआचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात चुरशीची लढत आहे. या मतदारसंघावर नागपूरकर मतदारांचे प्राबल्य लक्षात घेऊन तीनही उमेदवारांनी नागपूरवर अधिक लक्ष केंद्रित केले होते हे येथे उल्लेखनीय. गुरुवारी अजनीतील समुदाय भवनात सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात होणार असून नागपूरकर मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे स्पष्ट होईल.

असा ठरतो विजयाचा कोटा

झालेल्या एकूण मतदानापैकी वैध मतांच्या ५० टक्के मते अधिक एक असा विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित केला जातो. एकूण ३४ हजार ३४९ मतदान झाले. त्यापैकी अंदाजे सरासरी दोन हजारांवर मते अवैध किंवा नोटामुळे बाद ठरली तरी १६ हजार मतांचा कोटा निश्चित होऊ शकतो.

हेही वाचा – देशात प्रथमच उष्माघात नियंत्रणासाठी कृती आराखडा; रस्ते, इमारतींचे रंग, वृक्ष लागवडीचा अभ्यास करणार

विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत संघर्ष

निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तिला विलंब लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील चुरस लक्षात घेतली तर पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीच्या मतांवर एकही उमेदवार विजयाचा कोटा पूर्ण करण्याची शक्यता नाही, त्यामुळे उमेदवारांना विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागू शकतो.

हेही वाचा – Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

नागपूरमध्ये महिलांचे मतदान अधिक

नागपूर जिल्ह्यात झालेल्या मतदानात महिला शिक्षक मतदारांचा वाटा अधिक आहे. जिल्ह्यातील झालेल्या एकूण १३ हजार ४२० मतदानापैकी महिला मतदारांची संख्या ७०८२ तर पुरुष मतदारांची संख्या ६३३८ आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur teacher constituency election nagpur people vote decisive with a share of 47 percent in the total vote cwb 76 ssb
First published on: 01-02-2023 at 09:26 IST