नागपूर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात गुन्हेगारीने डोके वर काढलेले आहे. तर दुसरीकडे शहराच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर देहव्यापाराचे अड्डे राजरोस सुरू आहेत. सेंट्रल एव्हेन्यू वरील हॉटेल पॅराडाईजमध्ये देहव्यसाय चालविणाऱ्या अशाच अड्यावर छापा टाकत पोलिसांनी पिडीत विदेशी महिलेची सुटका केली. पोलिसांनी सोडविलेली पिडीत महिला उझबेकिस्तान येथील रहिवासी आहे. नवी दिल्लीतील एका दलाला मार्फत ती दोन दिवसांपूर्वी विमानाने नागपूरात आली होती.
या उझबेकी तरुणीकडून देह व्यवसाय करून घेणाऱ्या रश्मि खत्री नावाच्या महिलेला ताब्यात घेत पोलिसांनी समज देऊन तिला सोडून दिले. देहव्यापाराचा हा अड्डा चालविणाऱ्या खत्री हिने काही महिन्यांपूर्वीच हे हॉटेल भाडेतत्वावर घेतले होते. खत्री यापूर्वी याच हॉटेलमध्ये व्यवस्थापक होती. प्रकरणातला मुख्य दलाल कृष्णकुमार उर्फ राधे देशराम हा नवी दिल्ली येथील रहिवासी आहे. त्यानेच या विदेशी महिलेला नागपुरात आणले होते.
सेंट्रल एव्हेन्यूचा परिसर व्यापाऱ्यांची वर्दळ असलेल्या भाग म्हणून ओळखला जातो. या मध्यवर्ती भागात देह व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण सामाजिक सुरक्षा पथकाला लागली होती. त्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक उभा करून हॉटेलमध्ये पाठविला. त्या आधारे ७ हजार रुपयांमध्ये विदेशी महिला पुरविण्याचे ठरले. जशी महिला हॉटेलच्या खोली क्रमांक ४०३ मध्ये पोचली पोलीस पथकाने तिथे छापा टाकला.
येथून विदेशी पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे. तर हा देहव्यापार अड्डा चालविणाऱ्या रश्मी समज देत पोलिसांनी तिला सोडून दिले. या प्रकरणातला मुख्य दलाल कृष्णकुमार उर्फ राधे देशराम हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सोडविण्यात आलेल्या उझबेकी विदेशी महिलेची वैद्यकीय तपासणी करून सामाजिक सुरक्षा पथकाने तिला तहसील पोलिसांच्या स्वाधिन केले.
समाज माध्यमावरून दलाली
देहव्यवसाय अड्यासाठी समाजमाध्यमावरून जाहिरात प्रकाशित केली जात होती. खत्री नावाची ही दलाल स्वतः समाजमाध्यमांवर ग्राहक शोधून आणत होती. नवी दिल्लीतील दलाल कृष्णकुमारच्या मदतीने तिने या उझबेकी महिलेला दोन दिवसांपूर्वी विमानाने नागपुरात आणले होते. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपासून ही उझबेकी तरुणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होती.