scorecardresearch

Premium

यवतमाळ : वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; सहा गावांचा संपर्क तुटला, सात मार्ग बंद

वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे.

heavy rain in yavatmal
( तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने सहा गावांचा संपर्क तुटला तर सात मार्ग बंद झाले आहेत.)

वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने सहा गावांचा संपर्क तुटला तर सात मार्ग बंद झाले आहेत.

वणी तालुक्यात जीवितहानी, पशुधन हानी झाली नाही, मात्र शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने कवडशी, भुरकी, नवीन सावंगी, शेलू, चिंचोली, झोला, जुनाड, जुगाद या गावाचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे कवडशी मार्ग, शिवानी मार्ग, वरोरा, सावंगी, भुरकी, चिंचोली व जुगाद हे मार्ग बंद झाले आहेत. मारेगाव तालुक्यातही मंगळवारी पावसाने चांगलाच कहर केला. त्यातच बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे कोसारा, दापोरा, नवरगाव, पाटाळा, कुंभा हे मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

prices of vegetables in jalgaon, jalgaon vegetable prices increased, pitru paksha 2023
जळगाव जिल्ह्यात पितृपक्षामुळे भाजीपाला कडाडला
22 people fined in electricity theft case
आर्णी तालुक्यातील २२ जणांना वीज चोरीप्रकरणी पाच लाखाचा दंड
rain , Heavy rains caused heavy damage in Nandura taluka
बुलढाणा : अतिवृष्टीचा नांदुरा तालुक्याला जबर फटका, ११६ कुटुंब निराधार; २६ घरांची पडझड, जनावरांची दैना
Heavy rain Nandura taluka
बुलढाणा : नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान! पुरात वाहून युवक दगावला, वीस जनावरे मृत्युमुखी

वर्धा नदीकाठावरील सावंगी, शिवणी, आपटी, दांडगाव, झगडारीठ, वनोजा, चिंचमंडळ, दापोरा, गोरज, कानडा, पारडी, चनोडा, मुक्टा गावांना पुराचा धोका असल्याने प्रशासन सतर्क आहे. इसापूर धरण ९६ टक्के भरलेले असून सध्या ६११ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In vani taluka six villages lost connectivity and seven roads closed due to heavy rains amy

First published on: 10-08-2022 at 18:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×