वर्धा : वर्धा पूर्व म्हणून कधी काळी ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम रेल्वे स्थानाकावर आज मोठी दुर्घटना होणार होती. पण ती टळली. आज सकाळी ही घटना घडली आहे. या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर रिले रूमच्या बाजूला असलेल्या बहुउद्देशीय सेवा केंद्रात हा प्रकार घडला. या ठिकाणी पहाटे शॉर्ट सर्किटमूळे आग लागली. आग दिसून येताच सिग्नल ड्युटी वर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्क होत हालचाल केली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सूरू झाले.

सिग्नल कर्मचाऱ्यांनी आगीचे लोळ दिसताच प्रथम त्यांनी अग्निशमन यंत्रणेस सूचित केले. एल अँड टी कंपनीची अग्निशमन यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. या चमूतील अहफाज पठाण, राजेश ढोबे व सहकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सूरू केले. तेव्हाच वर्धा पालिकेची अग्निशमन यंत्रणा पोहचली. प्रथम स्टॉलला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बाजूच्या रिले रूमला आगीपासून दूर ठेवण्यात यंत्रणेस यश आले. पण सुरवातीस लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक झालेच. यामुळे सदर दुकानदाराचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. आग विझविण्यात त्वरित यश आल्याने मोठी दुर्घटना टाळता आली. पण तसे झाले नसते तर इटारशी रेल्वे स्थानाकप्रमाणे मोठी हानी झाली असती, अशी भीती व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक हे वरिष्ठ सहकाऱी असलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन आता घटनास्थळी पोहचले आहेत. ही आग कशी लागली, व्यवसाय चुकीच्या पद्धतीने, अग्नी प्रज्वलन सवलत, कर्मचारी उदासीनता, खाद्यपदार्थ तयार करणारी सामुग्री व अन्य पैलूने तपास केल्या जाणार.

Special trains, Konkan, Ganesh utsav,
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या, २१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार
Konkan Railway, monsoon, heavy rain, konkan
विश्लेषण : पावसाळ्यात कोकण रेल्वे पुन्हा बेभरवशाची का ठरली?
loksatta analysis importance of new railway station in thane
विश्लेषण : नवे ठाणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे का? ते कधी कार्यान्वित होणार?
kdmc taken action against hawkers outside dombivli stationkdmc taken action against hawkers outside dombivli station
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचे ठेले, मंचकाची तोडफोड
Traffic Chaos in Kalyan West, Traffic Chaos, Kalyan West, Commuters Frustrated Over Persistent Jams, kalyan news, traffic news,
कोंडीमुळे कल्याण पश्चिमेतील रस्ते, चौकांमध्ये वाहनांचा रांगा
Passengers, Kalyan, Dombivli,
मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकातून घरी
train services between kalyan and kasara are disrupted
एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवरा, वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून माती गेली वाहून
Trains, third railway line,
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गावर लवकरच वेगाने धावणार गाड्या; १८० कि.मी. चे काम पूर्ण

हेही वाचा : निकाल लागला मात्र नियुक्ती नाही; एमपीएससीच्या कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना दहा महिन्यांपासून…

विशेष म्हणजे सहा जुनपासून मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक मनीष अग्रवाल तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकारी विजयकुमार पांडे यांनी दुर्घटना टाळण्याबाबत कर्मचारी प्रबोधन सप्ताह साजरा केला होता. मानवरहित तसेच मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना हा मुख्य विषय होता. त्याबाबत जागरूकता वाढविणे तसेच या दुर्घटना होवू नये म्हणून अपेक्षित उपाय अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. सुरक्षा बाबत पॉम्पलेट, स्टिकर वाटण्यात आले. पण आगीची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन चिंतेत पडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांच्याशी या संदर्भात जाणून घेण्याचा वारंवर प्रयत्न करण्यात आला. पण संवाद होवू शकला नाही.