वर्धा : शिक्षक असेही असू शकतात, याचा आश्चर्यकरक नमुना पुढे आला आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या हिंगणघाट तालुक्यातील शाळा आता चांगलीच चर्चेत आली आली आहे. तालुक्यातील बोपापूर येथील उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक धनपाल सूर्यभान राऊत यांनी मुख्याध्यापक बादल धाबर्डे यांची कॉलर पकडून मारहाण केली. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्याचवेळी त्यांनी विद्यार्थ्यास मारहाण केली. महिला शिक्षकांस शिवीगाळ केली.

यापूर्वी अशाच कारणांनी त्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीत दोषी आढळले, निलंबित झाले. पण शिक्षा होऊनही सुधारणा झाली नाही. त्यांचे वर्तन पेशास शोभणारे नसून जिल्हा प्रशासनाची बदनामी करणारे आहे. त्यांचे वर्तन खपवून घेतल्या जाणारे नाही. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिशद आदिनियम अंतर्गत विविध तरतुदीचा भंग केला आहे. म्हणून धनपाल सूर्यभान राऊत यांना निलंबित करण्यात येत आहे.

निलंबित काळात राऊत यांना कोणताही व्यवसाय, नोकरी किंवा धंधा करता येणार नाही. केल्यास परत कारवाई होणार. कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा वरिष्ठ नेत्याचा दबाव आणता येणार नाही. तसे झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी स्पष्ट केले.

हे जरा वेगळेच प्रकरण आहे. धुंद अवस्थेत शाळेत जाणे व तमाशा करण्याची बाब घडली आहे. शिक्षक नेते समजावून थकले. गोजी शाळेत हा धुंद प्रकार घडला, त्यावेळी गावाकऱ्यांनी ओरड केली होती. म्हणून मग बदली झाली. नव्या ठिकाणी हे शिक्षक महोदय पुन्हा रंगात रंगले. मारपीट केली. मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थिनीस बदडले. पालक तक्रार करण्यास गेले तेव्हा त्यांनाही शिवीगाळ केली.

मात्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात की नोटीस न देताच कारवाई झाली. बाजू मांडण्याची संधी देणे अपेक्षित होते. चौकशी करण्याचा प्रकार दिसत नाही. दुसरा जो शिक्षक आहे त्याच्यावर काय कारवाई झाली ते पुढे आले नाही. जे चौकशी करणार होते ते सर्व जिल्हा परिषद सांस्कृतिक महोत्सवत हजर आहे. म्हणून तडकाफडकी कारवाई शंकास्पद ठरते, असा युक्तीवाद कोंबे करतात. एकूणच हे प्रकरण गाजू लागले आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने गावकरी संतप्त तर चौकशी न करता शिक्षकावर कारवाई, असा तीढा दिसून येत आहे.

Story img Loader