scorecardresearch

यवतमाळ : चायनीज मांज्याने चिमुकल्याचा गळा चिरला, बंदी असतानाही सर्रास विक्री

चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री होत आहे. हा मांजा दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी नागपूर रोड ते स्टेटबँक चौक रस्त्यावर मांज्यामुळे पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला.

Yavatmal Chinese manja
यवतमाळ : चायनीज मांज्याने चिमुकल्याचा गळा चिरला, बंदी असतानाही सर्रास विक्री (प्रातिनिधिक छायाचित्र)

यवतमाळ : चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री होत आहे. हा मांजा दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी नागपूर रोड ते स्टेटबँक चौक रस्त्यावर मांज्यामुळे पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला. जैन रफिक मवाल, असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकीचालकाने सावधानतेने ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळा चिरल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

रविवार अन् दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने जैन हा आपला काका वसिम मवाल यांच्यासोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्ये जात होता. दरम्यान, नागपूर रोडकडून स्टेट बँक चौकाकडे जात असताना गणेश चौकात चायनीज मांजा कुठून तरी उडून या दुचाकीवर आला आणि समोर बसलेल्या जैनच्या गळ्यात अडकला. यामुळे जैनचा गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले. ही बाब वसीम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी जागेवर थांबवली आणि जखमेची पाहणी केली. जखम खोल आणि त्यातून होणारा रक्तस्त्राव अधिक असल्याने लगेच शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहता शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार रविवारी रात्री उशिरा जैनवर शस्त्रक्रिया पार पडली.

old people hunger strike Karanja
वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर
murder crime
सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय
in dombivli illicit liquor dens at residential area
डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त

हेही वाचा – अकोला : सहलीला जाणे युवकाच्या जीवावर बेतले; दुचाकी दुभाजकावर आदळली, हेल्मेट परिधान केलेले तरीही…

हेही वाचा – अकोला : अज्ञात वाहन भरधाव आले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले… पादचारी युवकाचा दुर्दैवी अंत

चायनीज मांज्यावर बंदी आहे. पोलीस, वन विभागाला हा मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करत नसल्याने सर्रास दुकानांवर हा मांजा विकला जात आहे. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजा विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. यामुळे संबधित विभागाने यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In yavatmal a child injured by chinese manja nrp 78 ssb

First published on: 20-11-2023 at 14:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×