यवतमाळ : सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना राळेगाव तालुक्यातील करंजी (सो) येथील नागरिकांना पावसाळ्यात सतत पाणी वाहणाऱ्या जीवघेण्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना चक्क नाल्याच्या रपट्यावरून दररोज ये-जा करवी लागते. पूर असतानाच अशी स्थिती नसते तर, पूर नसला तरीही जवळपास गुडघ्याभर पाण्यातून दररोज वाट काढावी लागते.

राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील तीन फूट उंचीचा पूल आहे . हा पूल अतिशय उथळ आहे. प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी या नाल्यावरून पाणी वाहायला लागते. अशा परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, गावातील कर्मचारी कधी या बाजूने, तरी कधी त्या बाजूने अडकून पडतात. जास्त पाणी वाहत असल्यास ते कमी होण्याची प्रतीक्षा करत तासंतास थांबावे लागते. अनेकदा नागरिक जीव मुठीत धरून या रपट्यावरील वाहत्या पाण्यातून वाट काढतात.

fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Amravati news Article on Farmers Crop Insurance
शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे
Doctors of Paral Wadia Hospital succeeded in removing a tangle of hair from a 10 year old girl stomach Mumbai
मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता; वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?

याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही. पुरात कोणी वाहून गेल्यानंतरच प्रशासन येथील रपट्याची उंची वाढवणार काय, असा प्रश्न करंजी (सो) येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी केला आहे. स्थानिक आमदारांचे गावाकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या पाऊस नाही, कुठे पूरही नाही तरीसुद्धा या नाल्यावरील रपट्यावरून पाणी वाहत आहे. मुलांना कडेवर घेऊन पलिकडे सोडून द्यावे लागते. मुलं घरी येईपर्यंत पालक चिंतातूर असतात, असे गावकऱ्यांनी सांगितले. हा रपटा तत्काळ दुरूस्त न केल्यास विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसण्याचा इशाराच करंजी (सो) येथील सरपंच प्रसाद ठाकरे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा : नवसंकल्पना! कर भरा अन् दळण मोफत दळून घ्या… कुठे राबवली जातेय ही योजना?

चार्जरच्या वायरने गळफास

उच्च शिक्षणासाठी बंगळूरू येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या एका विद्यार्थ्याने घरात मोबाईल चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. उमरखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य उर्फ बन्नी श्रीनिवास दुर्गमवार (२२) रा. जवाहर वॉर्ड, उमरखेड असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा : यवतमाळ : सावधान! हवाबंद डब्यातील मिठाईत बुरशी, हल्दीराम स्टोअरला…

आदित्यने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. बी.बी.ए.चे शिक्षण पूर्ण करून आदित्य बंगळुरू येथे एमबीएला प्रवेश घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी निघणार होता. त्याने रविवारी रात्री वडिलांसोबत क्रिकेटची मॅच पाहिली. क्रिकेट सामना संपल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मध्यरात्रीदरम्यान त्याने खोलीतील पंख्याला मोबाइल चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी वडील श्रीनिवास यांनी रूममध्ये प्रवेश केला असता तो मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास उमरखेड पोलीस करत आहेत.