नागपूर : आफ्रिकेतील चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात पाच नर आणि तीन माद्यांना या उद्यानात सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाची सुरुवात होईल.

या चित्त्यांना सुरुवातीला खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधी नर चित्त्यांना जंगलात सोडले जाईल. त्यानंतर मादी चित्त्यांना सोडले जाणार आहे. नर हे जंगलात दोन ते तीनच्या समूहात राहतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी या प्रकल्पाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा व वन खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी होते.  चित्त्यांसाठी उद्यानात पुरेसा शिकारी तळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राजगड जिल्ह्यातील नरसिंगगढजवळील चिडीखो वन अभयारण्यातून ठिपकेदार हरीण आणले जात आहेत.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

मध्य प्रदेश वन खात्याच्या अधिकाऱ्यांना चित्त्याच्या व्यवस्थापनासाठी नामिबियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. कुनो राष्ट्रीय उद्यान ७५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले असून या परिसरात २० ते २४ चित्ते राहू शकतात. याशिवाय चित्त्यांच्या अधिवासासाठी श्योपूर आणि लगतच्या शिवपुरी जिल्ह्यातील अतिरिक्त तीन हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचा विचार देखील करण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेने चित्त्यांचे इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे, पण भारतात हे प्राणी पहिल्यांदाच पाठवले जात आहेत. त्यामुळे प्रकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  दरम्यान, अधिक माहितीसाठी मध्य प्रदेशच्या वन खात्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे.एस. चौहान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.  दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव तज्ज्ञांचे एक पथक मंगळवारी कुनो राष्ट्रीय अभयारण्यात पोहचले होते. सोबत भारतीय वन्यजीव संस्थेचे अधिष्ठाता व वरिष्ठ प्राध्यापक यादवेंद्रदेव विक्रमसिंह हे देखील होते. चित्त्यांना सोडण्यात येणाऱ्या जागेची आणि संपूर्ण व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.