scorecardresearch

समृध्दी महामार्गावर प्रवास करत आहात; तर ही काळजी घ्या, घरुनच….

११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकपर्ण झाले. केंद्र सरकारचा हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या महामार्गावर अनेक त्रुटी आढळून येत असल्याचे समोर आले आहे.

समृध्दी महामार्गावर प्रवास करत आहात; तर ही काळजी घ्या, घरुनच….
समृध्दी महामार्गावर हॉटेल, पेट्रोल पंपांसह, वैद्यकीय सुविधांची गैरसोय

समृध्दी महामार्ग सुरू झाला. त्याचे कौतुकही झाले. पण आता त्यावर प्रवास करतात येणाऱ्या अडचणीवर लोकं बोलू लागले आहेत. १०० किमीच्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट नाही. पेट्रोल पंप नाही. एवढेच काय तर गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत.

हेही वाचा- वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

समृद्धी महामार्गावरून सामाजिक कार्यकर्ता दीपक साने यांनी प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमातून लोकांना सांगितले. त्यांनी नागपूर पासून प्रवास सुरू केला. वाटते त्यांना कुठे हॉटेल, रेस्टॉरंट दिसले नाही. विशेष म्हणजे वाटेत पेट्रोल पंप दिसत नाही. दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही. साने यांनी समृद्धीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तेथे वरील अडचणी मागल्या. विशेष म्हणजे ५२० किमी च्या नागपूर-शिर्डी प्रवासा दरम्यान पहिले
नियंत्रण कक्ष औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 13:39 IST