अनिल कांबळे

नागपूर : सायबर गुन्हेगार पैसे कमावण्यासाठी तरुणींचा वापर करून ‘सेक्स्टॉर्शन’ करीत आहेत. समाजमाध्यमांवर छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन अनेकांकडून लाखोंची खंडणी उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ‘सेक्स्टॉर्शन’ गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत मोठी वाढ झाली असून सर्वाधिक गुन्हे मुंबईत दाखल असून त्यापाठोपाठ नागपूर आणि पुणे शहराचा क्रमांक लागतो.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे अनेकांना ऑनलाईन राहण्याची सवय झाली आहे. अनेकांना पॉर्न वेबसाईटवर अश्लील चित्रफिती बघायची सवय असते. अशा वेबसाईटवर नाव आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागते. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या संदेशावर ‘क्लिक’ केल्यास सुंदर तरुणीचे छायाचित्र दिसते. तेथे काही लिंक किंवा मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्यावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर सायबर गुन्हेगार असलेली तरुणी स्वत:च अश्लील हावभाव करते. समोरील व्यक्तीला तसे करण्यास प्रवृत्त करून ‘स्क्रिन रेकॉर्डिग’ करण्यात येते. ती चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली जाते. तर अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल येतो. कॉल उचलताच ‘रेकॉर्डिग’ सुरू होते. त्यानंतर लगेच पैशाची मागणी करीत व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली जाते. भीती आणि बदनामीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना लाखो रुपये देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अश्लील छायाचित्राची मागणी

एखादी तरुणी किंवा महिला सायबर गुन्हेगाराच्या जाळय़ात अडकली असेल तर तिला लुबाडलेले पैसे परत करण्याचे आमिष दाखवून अश्लील छायाचित्राची मागणी करतात. त्यानंतर तिचा विश्वास बसावा म्हणून काही रक्कम तिच्या खात्यात परत टाकण्यात येते. उर्वरित रक्कम परत करण्यासाठी तिला बेडरूम किंवा बाथरूमध्ये जाऊन ‘व्हिडिओ कॉल’ करण्याची मागणी केली जाते. त्यानंतर महिलांचे अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलांकडून खंडणी उकळली जाते. अशाप्रकारच्या काही घटना नागपुरात उघडकीस आल्या असून संसार मोडू नये आणि बदनामीच्या भीतीपोटी तक्रार न दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बदनामी, भीतीपोटी..

‘सेक्स्टॉर्शन’चा बळी पडल्यानंतर सायबर गुन्हेगार ५ ते १० हजार रुपये खंडणी मागतो. त्यामुळे पीडित व्यक्ती तेवढे पैसे देऊन सुटका करण्याचा प्रयत्न करतो. दिलेल्या क्रमांकावर एकवेळा पैसे पाठवल्यानंतर वारंवार पैशाची मागणी केली जाते. त्यानंतर पोलिसात जाण्याची धमकी दिली जाते. भीतीपोटी अनेक जण लाख ते दोन लाख रुपये सायबर गुन्हेगारांना देतात.

२०२०-२१ ची आकडेवारी

मुंबई : २१२, नागपूर : ४६, पुणे : १२

सायबर गुन्हेगार ‘सेक्स्टॉर्शन’साठी सापळा रचतात. त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून आलेले ‘व्हिडिओ कॉल’ उचलू नये. कुणी अनोळखी व्यक्तीशी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर संवाद साधू नये. कुणी बदनामीची भीती दाखवून खंडणी मागत असल्यास लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करा. तक्रारकर्त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

– नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन