भंडारा : नाना काँगेसमधून भाजप आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये उड्या मारतात. काँग्रेस पक्षामध्ये काहीही योगदान नसलेल्या व्यक्तींना पटोले यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली. पैसे घेऊन डमी उमेदवार देणाऱ्या नानांनी माझी राजकीय हत्या केली आहे आणि काँग्रेस देखील विकली, असा आरोप अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांनी केला.

आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, नाना पटोले यांनी मुंबईत मला अपमानित केले होते. मी नाना पटोले यांनी उत्तर दिले की ‘ नाना, तुला मी आमदार बनविले, तू किस खेत की मुली है…’. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मला समजावले म्हणून मी शांत झालो. पण नाना माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना मी तिकीट दिले आहे. मात्र, यावेळी त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी माझे तिकीट कापले. चित्रा वाघ यांनी पटोले यांच्यावर आरोप केले होते की, चेरापुंजी येथे नाना एका मुलीसोबत होते. नानासारख्या चारित्र्यहीन माणसासोबत मला काम करायचे नाही. मी काँग्रेस वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी स्वतंत्र आहे आणि श्रीमंत आहे. नानासारखा मी लालची नाही. उद्या राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent candidate sevak waghaye alleges against congress nana patole ksn 82 amy
First published on: 13-04-2024 at 04:07 IST