नागपूर : देशात जेवणावरून वादंग उठला आहे. काही भागात मांस, मासोळी नियमित खाण्यात येत असले तरी घरी मांस मिळाल्याच्या कारणावरून देशात मारहाण झाल्याचे प्रकार समारे आले आहे.
काही व्यक्तींकडून त्यांच्या भागात मांस खाणाऱ्यांना विरोध झाल्याच्या घटना आहेत. शाकाहारी भोजनाची आग्रही मागणीही काहींकडून होत असते. तर दुसरीकडे सरकारही तुम्ही जेवणात काय घेता, कोणते धान्याला प्राधान्य देता याची माहिती सरकार जाणून घेणार आहे. सरकारी व्यक्ती तुमच्या घरी येऊन ही माहिती घेईल.
केंद्र सरकारने दोन टप्प्यात जनगणना करण्याच निर्णय घेतला आहे. जवळपास १५ वर्षांनी ही जनगणना करण्यात येत आहे. कोरोनाचे कारण देत जनगणना टाळण्यात आली. त्यानंतर जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीने जोर धरला. सरकार प्रथम यासाठी समर्थक नव्हता. परंतु नंतर सरका तयार झाले. त्यामुळे दोन टप्प्यात याचे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना होणार असून पुढील वर्षी प्रत्यक्ष जनगणना होईल.
या घरगणनेच्या माध्यमातून अनेक माहिती सरकार जाणून घेणार आहे. याची तयारी प्रशासनाकडून सुरू असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. राज्यात १६ मे पासून घरगणनेचे काम सुरू होणार आहे. ते १४ जूनपर्यंत चालणार आहे. त्यापूर्वी स्वगणना करण्याची भुमाही देण्यात आली आहे. घरगणनेसाठी नियुक्त प्रगणकांकडून प्रत्यक्ष घरी जाऊन माहिती घेण्यात येणार आहे.
३३ प्रश्नांची विचारणा
यंदाची गणना ही डिजीटल असणार आहे. यासाठी एक ॲप विकसित करण्यात आले आहे. घरगणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारे ३३ विचारले जातील. या माध्यमातून घराचा प्रकार, सिमेंट काँक्रिटचे आहे की मातीचे, छताचा प्रकार, किती जण राहतात, घर स्व:मालकीचे आहे की नाही, ते अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर वर्गातील आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे स्रोत, त्याची उपलब्धता, प्रकाश व्यवस्था, शौचालयाचा प्रकार व त्याची व्यवस्था, स्नानगृह, स्वयंपाकगृह, गॅस सिलिंडर, पाईप गॅसची व्यवस्था, जेवण तयार करण्याची पद्धत, रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप, संगणक, मोबाईल आदीचीही माहिती जाणून घेण्यात येणार आहे. घरातील वाहनांची माहिती या निमित्त्याने सरकारकडून गोळा करण्यात येणार आहे. तसेच यंदा जेवणातील मुख्य धान्याचीही माहितीही घेण्यात येणार आहे. प्रथमच धान्याची माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
