scorecardresearch

Premium

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल,” सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल अशी खात्री महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Sudhir Mungantiwar at japan
जपान येथील कोबे शहारात भारत-जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘इंडिया मेला’ या कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

चंद्रपूर: ‘इंग्रजी वर्णाक्षरांमध्ये ‘आय’ आणि ‘जे’ ही दोन अक्षरे जवळ आहेत. ‘आय’ म्हणजे इंडिया आणि ‘जे’ म्हणजे जपान. वर्णाक्षरांप्रमाणेच इंडिया आणि जापानही एकमेकांच्या जवळ आहेत. ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील,’ असा विश्वास व्यक्त करून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल अशी खात्री महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली

Sharad Pawar criticism that Narendra Modi guarantee has no date pune
मोदींच्या ‘गॅरंटी’ला ‘तारीख’ नाही! शरद पवार यांची टीका
dcm devendra fadnavis on maratha reservation solution
‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…
Sandeep Deshpande on BJP Meet
राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं? देशपांडे म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
solapur ajit pawar marathi news, ajit pawar latest marathi news, ajit pawar supriya sule latest marathi news,
“सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उत्तरासाठी आपण बांधील नाही”, अजित पवारांचे भाष्य

जपान येथील कोबे शहारात भारत-जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘इंडिया मेला’ या कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जपानचे उच्चायुक्त सिविजाज, कोवे उपमहापौर काजुनरि उहारा, तेजसिनियमशिता, निखिलेश गौरी राम कलानी, भावेन जवेरि, चेंबर ऑफ कॉमर्स चे जॉनी लालवाणी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. ते म्हणाले, सर्वात आधी सूर्याची किरणे जपान या देशावर पडतात; सर्वप्रथम सूर्यदर्शन होणारा हा देश आहे. आमचा भारत जेथे कोणार्कला सूर्य मंदिर आहे, नेहमीच सूर्यपूजक जपानशी मैत्रीपूर्ण संबंध जपून ठेवत आला आहे. अध्यात्मिक दृष्टीकोनातून भारत आणि जपान यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध राहिले आहेत. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ अर्थात ‘जियो और जिने दो’, असा संदेश देणारे बुद्धिझम भारतातून जपानमध्ये आले आहे; हा विचार जपानच्या घराघरात आणि मनामनात पोहोचविण्याचा जपानने सातत्याने प्रयत्न केला आहे; ज्यात त्यांना यश आले आहे.’

आणखी वाचा-प्रेम प्रकरणाची कुणकुण पोहचली घरात… अन् प्रियकराविरुद्ध गुन्हा

ओघवत्या हिंदी भाषेत आणि त्यांच्या विशेष शैलीत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘मला यासाठी जपान या देशाचे आकर्षण असण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणारा हा देश आहे. टोकीयो शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मंदिर याची साक्ष देत असून मला याबद्दल जपानचा आदर आणि अभिमान वाटतो.’ संस्कृती आणि परंपरा ही जीवन जगण्याची कला आहे. धन माणसाच्या भौतिक समाधानाचे साधन आहे तर संस्कृती हे मनाच्या समाधानाचे उत्तम साधन आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ देखील कोणता देश किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे या आधावर त्या देशाच्या आनंदाची व्याख्या निश्चित करीत आहे, असेही ते म्हणाले.

मुनगंटीवार यांची जपानी भाषेत भाषणाची सुरुवात

सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाची सुरुवात जपानी भाषेत केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवत मुनगंटीवार यांचे स्वागत करत प्रतिसाद दिला. यावेळी आपल्या भाषणात मुनगंटीवार म्हणाले जपानी बांधवांना भेटण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद झालाय, सर्वांशी संवाद साधण्याचे सौभाग्य प्राप्त झाले याचे समाधान वाटत आहे.

आणखी वाचा-नांदेड रुग्णालय मृत्युसत्रानंतर प्रशासन सतर्क, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालयात…

महाराष्ट्राचा अभिमान

जगात १९३ राष्ट्र आहेत, परंतु महाराष्ट्र मात्र एकच आहे, आणि तो आमचा आहे, याबद्दल अभिमान आहे, या शब्दांत मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या संस्कृतीक कार्यक्रमांचे जपानमध्ये सादरीकरण झाल्याचा मला राज्याचा मंत्री म्हणून मनापासून आनंद झाला आहे. महाराष्टाच्या कलाकारांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रम सादर केले, त्यांचे मी अभिनंदन करतो: त्यांच्या कार्यक्रमामुळे जपान च्या कोबे शहरातील कला रसिकाच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह बघून खूप आनंद वाटतोय असेही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India japan friendship will strong under leadership of pm narendra modi says sudhir mungantiwar rsj 74 mrj

First published on: 08-10-2023 at 14:06 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×