नागपूर : संघ परिसरात तिरंगा फडकविणाऱ्याचा काँग्रेसकडून सत्कार ; खासदार मुकुल वासनिक स्वत: मेंढेंच्या घरी पोहोचले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ मध्ये तिरंगा ध्वज फडकविला होता.

नागपूर : संघ परिसरात तिरंगा फडकविणाऱ्याचा काँग्रेसकडून सत्कार ; खासदार मुकुल वासनिक स्वत: मेंढेंच्या घरी पोहोचले
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी बाबा मेंंढे यांच्या निवासस्थानी भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ मध्ये तिरंगा ध्वज फडकविला होता. त्यात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा मेंढे याचा समावेश होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. आता देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी बाबा मेंंढे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

२६ जानेवारी २००१ रोजी सकाळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त भेदून बाबा मेंढे यांनी तेथे तिरंगा झेंडा फडकविला, असा काँग्रेसच दावा आहे. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. शनिवारी दुपारी सोनेगाव येथील मेंढे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार मुकुल वासनिक यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी वासनिक यांनी बाबा मेंढेंकडून त्यावेळच्या आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी संदेश सिंगलकर यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
यवतमाळ : खासदार भावना गवळींचा निषेध, तर संजय राठोड यांच्या स्वागताला अलोट गर्दी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी