अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच अजमेर येथील ‘उर्स फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मच्छलीपट्टणम–अजमेर, काचीगुडा–मदार व हैदराबाद-अजमेर स्थानकांदरम्यान विशेष भाड्याने अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मच्छलीपट्टणम–अजमेर गाडी क्रमांक ०७२७४ विशेष २१ डिसेंबर रोजी १० वाजता मच्छलीपट्टणम येथून प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी १५.३० वाजता अजमेर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७२७५ विशेष २८ डिसेंबर रोजी ८.२५ वाजता अजमेर येथून प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी ९.३० वाजता मच्छलीपट्टणम येथे पोहोचेल. या गाडीला गुडीवाडा, विजयवाडा, खम्मम, दोरनाकल, महबूबाबाद, वारंगल, जम्मीकुंटा, पेड्डापल्ली, करीमनगर, लिंगमपेट, जगत्याल, मोर्तड, आरमूर, निजामाबाद, बसर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, भिलवाडा, विजयनगर व नशिराबाद येथे थांबा आहे.
काचीगुडा–मदार गाडी क्रमांक ०७७३३ विशेष २३ डिसेंबर रोजी २३.३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी १३.०० वाजता मदार येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७७३४ विशेष दिनांक २८ डिसेंबर रोजी १८.१० वाजता मदार येथून प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी १० वाजता काचीगुडा येथे पोहोचेल. या गाडीला मलकाजगिरी, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बसर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, भिलवाडा, विजयनगर, नशिराबाद व अजमेर येथे थांबा आहे.
हैदराबाद-अजमेर-हैदराबाद गाडी चालवली जाणार आहे. हैदराबाद-अजमेर गाडी क्रमांक ०७७३१ विशेष २३ डिसेंबरला सकाळी ११.३० हैदराबाद येथून निघेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी २.१५ अजमेर येथे पोहोचेल. अजमेर-हैदराबाद गाडी क्रमांक ०७७३२ अजमेर येथून २७ डिसेंबर रोजी १८.५० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी हैदराबाद येथे ११ वाजता पोहोचेल. या गाडीला सिकंदराबाद, माल्काजिगरी, मेद्दाल, कामारेद्दी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मांडसौर, नीमच, चित्तोडगड, भीलवाडा, बिजयनगर, नसीराबाद आणि अजमेर या स्थानकांवर थांबा आहे. विशेष गाड्यांच्या थांब्यांबाबत व वेळापत्रकाबाबत सविस्तर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
