नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन, बाल विज्ञान संमेलन होणार आहेत. यासह विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रसिद्ध उद्योजिका टीना अंबानी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे.

गुरुवारी सकाळी ९.३० वा. डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास पद्मश्री राहीबाई पोपेरे आय.एस.सी.ए. चे प्रमुख वैज्ञानिक डॉ.अनुपकुमार जैन, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख, पशु दुग्ध व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. मुख्य सभागृहात दुपारी २ वा. पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजिका टिना अंबानी, कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हॉलमध्ये सकाळी ९.३० ते सायं. ५.३० पर्यंत राष्ट्रीय बालविज्ञान संमेलनाचे कार्यक्रम होतील.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

हेही वाचा >>> पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

आजचे परिसंवाद

सकाळी ९ वाजेपासून परिसंवादांना सुरुवात होईल. औषधी विज्ञान विभागाच्या सभागृहात ‘अंत:स्त्रावी आणि कर्करोग जीवशास्त्रातील प्रगती (इन एन्डोक्राइन ॲड कॅन्सर बायोलॉजी)’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी भुवनेश्वर येथील बिर्ला ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रेमंदू पी. माथुर राहतील. डॉ. मालिनी लालोराया, थिरुवनंतपुरम., प्रा. सुरेश येनूगु, हैद्राबाद विद्यापीठ, डॉ. शाहीद उमर आदी वक्ते सहभागी होतील. गणित विभागाच्या सभागृहात ‘सृजनात्मक संशोधन आणि कोविड नियंत्रणासाठी नियोजन आणि भविष्यातील विषाणूची महामारी’या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सोनीपतच्या (हरियाणा) एस.आर.एम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.एस.राजाराजन हे असतील.सहभागी वक्त्यांमध्ये प्रा. एस.पी. त्यागराजन, कोईम्बतूर. प्रा. डॉ. अभय चौधरी, हाफकिन इन्स्टिट्युट मुंबई, डॉ. शांथी साबरी, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. रसायनशास्त्र विभागात मानवी आरोग्यामध्ये ग्लायकोबायोलॉजीचा परिणाम, रोग आणि कर्करोग उपचारपध्दती,विषयावर परिसंवाद होणार आहे. कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी ऑफ टेकालॉजीचे प्रा.बी.पी.चटर्जी अध्यक्षस्थानी असतील.