नागपूर : विमान इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंडिगोकडून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फ्युएल सरचार्ज वाढविण्यात आला आहे. मात्र, यापूर्वी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना या वाढीव शुल्काचा फटका बसणार नाही.
एटीएफ दरवाढीचा परिणाम
विमान इंधन अर्थात एटीएफच्या दरात प्रति लिटर तब्बल १६ रुपयांनी वाढ झाल्याने विमान कंपन्यांच्या प्रवास खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून इंडिगोने ६ ऑक्टोबरपासून करण्यात येणाऱ्या नवीन बुकिंगवर फ्युएल सरचार्ज वाढविला आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी अंतरानुसार ३७५ ते १,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी दरवाढ असल्याने विमान प्रवाशांच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागपूरहून प्रमुख मार्गांवर वाढ
नागपूरहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाड्याचा सामना करावा लागणार आहे. उपलब्ध दरांनुसार नागपूर-हैदराबाद प्रवासाचे भाडे ७,४०१ रुपयांवरून ८,२७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नागपूर-मुंबई मार्गावरील भाडे ६,३४० रुपयांवरून ६,४९९ रुपये, तर नागपूर-दिल्ली मार्गावरी ते ३५० रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्गाचे अंतर आणि विमान प्रवासाच्या स्वरूपानुसार शुल्कातच्या वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शुल्काच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फ्युएल सरचारिमतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यामुळे परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना तिकीट खर्चाचा नव्याने विचार करावा वाजून १ मिनिटापासून करण्यात आलेल्या नवीन बुकिंगला लागू होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना वाढीव फ्युएल सरचार्जखी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस काही मार्गांवरील तिकीट दर १५ हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता ट्रॅव्हल एजंट्सनी व्यक्त केली आहे. ऐन सणाच्या काळात काही मार्गांवर तिकीट दर २० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाजही व्यक्त करण्यातल भाडे ६,८४३ रुपयांवरून ७,१५८ रुपये झाले आहे. देशांतर्गत मार्गांवरील फ्युएल सरचार्जमध्ये प्रत्यक्ष वाढ १०० ते ३५० रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मोठी वाढ
देशांतर्गत प्रवाशांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना फ्युएल सरचार्जच्या वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शुल्काच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फ्युएल सरचार्जमध्ये प्रति सेक्टर तब्बल २,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इंडिगोकडून करण्यात आलेली ही वाढ इंधनाच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
आधीचे बुकिंग सुरक्षित
फ्युएल सरचार्जमध्ये करण्यात आलेली सुधारणा मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून करण्यात आलेल्या नवीन बुकिंगला लागू होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना वाढीव फ्युएल सरचार्ज भरावा लागणार नाही. दरम्यान, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांची मागणी वाढत असल्याने तिकीट दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस काही मार्गांवरील तिकीट दर १५ हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता ट्रॅव्हल एजंट्सनी व्यक्त केली आहे. ऐन सणाच्या काळात काही मार्गांवर तिकीट दर २० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
