नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील युवकांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. देशभरातून या योजनेचे कौतुकही झाले. परंतु, महाज्योती, राज्य सरकार आणि नागपूर फ्लाईंग क्लबच्या कुचकामी धोरणामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२४च्या पहिल्या आठवड्यात प्रशिक्षणार्थींच्या आमरण उपोषणाची दखल घेत दुसऱ्या संस्थेशी करार करून प्रशिक्षण देण्याच्या आश्वासनाचाही सरकारला विसर पडला आहे. व्यवसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्याला २०० तास विमान उडविण्याचा अनुभव असेल तरच त्यांना कमर्शियल पायलट लायसेन्स (सीपीएल) दिले जाते. याच परवानाच्या आधारे तो नोकरीस पात्र ठरतो. यासाठी महाज्योती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांच्यात करार झाला. यासाठी ‘महाज्योती’ने नागपूर फ्लाईंग क्लबला साडेसात कोटी रुपये दिले. या प्रशिक्षणासाठी राज्यातील २० विद्यार्थ्यांची निवड झाली.

हेही वाचा >>> राज्यभरात कुत्रे, मांजर, माकडांमुळे नागरिक त्रस्त… चावा घेतल्याने…

मायदेशी परतलेल्या स्थलांतरितांची चौकशी; अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरच्या विमानतळावर दाखल
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Drones will be used for firefighting mumabi news
अग्निशमनासाठी ड्रोनचा वापर करणार; अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी ७३६.६३ कोटी रुपयांची तरतूद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी तेव्हा विमानातच होत्या, पण नेमकं घडलं काय? प्रश्न अनुत्तरीतच!
kinjarapu ram mohan naidu pune marathi news
Air Taxi: ‘एअर टॅक्सी’ची २०२६ मध्ये चाचणी, केंद्रीय नागरी हवाईमंत्री नायडू यांची माहिती
Navi Mumbai Airport will be operational in three months training classes for affected youth start soon
विमानतळबाधित तरुणांना प्रशिक्षण, सिडको मंडळ आणि अदानी कंपनीच्या समन्वयातून कौशल्यवर्ग
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
Pune Prayagraj Air Flight , Pune Prayagraj ,
पुणे प्रयगराज हवाई उड्डाण थेट नाहीच, प्रवाशांची नाराजी

१ नोव्हेंबर २०२२ ला प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणाचा कालावधी १८ महिन्यांचा होता. यात किमान २०० तास विमान उडवण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. परंतु, प्रशिक्षणाचा कालावधी ३० एप्रिल २०२४ ला संपला आणि विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले नाही. काही विद्यार्थ्यांना तर एक तास देखील विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या चार दिवसांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या दुसऱ्या संस्थेची करार करून प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत.

हेही वाचा >>> नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात

कुणी शून्य तास तर कुणी एक तास उडवले विमान

२०० तास विमान उडवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय प्रशिक्षणार्थ्याला नोकरी मिळू शकत नाही. या विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया गेली आहेत. यातील काहींनी शुन्य तर काहींनी केवळ एक तास विमान उडवले आहे. अविनाश येरणे, शुभम गोसावी, स्वप्निल चव्हाण (तिघांनीही शून्य तास), रोहित बेडवाल (१ तास), विनय भांडेकर (३ तास), सानिका निमजे (६ तास), भक्ती पाटील (११ तास), जयेश देशमुख (१५ तास), तेजस बडवार (१५ तास), ऋतुंबरा देवकाते (१६ तास), हार्दिका गोंधळे (२० तास) विश्वनाथ जाधव (२५ तास), प्रणव साखरकर (२८ तास) आणि स्नेहल खैरनार (३५ तास)

राज्य सरकार आणि ‘महाज्योती’च्या चुकीच्या धोरणामुळे २० विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई म्हणून महाज्योतीने त्यांना किमान एक लाख रुपये महिना द्यायला हवा. -उमेश कोर्राम, संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.

दर्जेदार प्रशिक्षणासाठी कटिबद्ध : खवले नवीन प्रशिक्षण संस्थेशी करार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा काढून आता महाराष्ट्राच्या नजिक असलेल्या गोवा, कर्नाटक अशा राज्यांमधूनही निविदा मागितल्या आहेत. याला प्रतिसाद मिळत असून नवीन करारानंतर प्रशिक्षण सुरू होईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ‘दोन इंजिन’ असलेल्या विमानात प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे  महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.

Story img Loader