scorecardresearch

Premium

शंकरबाबा पापळकरांच्या मानस कन्येचे ‘एमपीएससी’त यश…कचरा पेटित सापडलेल्या मुलीचा…

समाजाने नाकारलेल्या १२७ मुलींसोबत मालाचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहात जीवनप्रवास सुरू झाला.

inspiring story orphan blind girl manas orphan daughter of shankar baba papadkar succeeds in mpsc exam
आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सत्कार केला.

नागपूर : जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या व जन्मत: अंध असलेल्या ‘माला’ला ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी वझ्झर येथील अनाथ आश्रमात वाढवून बाप म्हणून स्वत:चे नाव दिले. याच मालाने बुधवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश मिळवले. यानिमित्त तिचा आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सत्कार केला.

हेही वाचा >>> पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!..  प्रकरण काय पहा..

There are no Rohyo works in the rural areas of Buldhana district where drought-like conditions exist Buldhana
धक्कादायक! ५५० ग्रामपंचायतीत ‘रोहयो’ची कामेच नाही, मजुरांची दैना; दुष्काळसदृश्य बुलढाण्यातील चित्र
सोलापूर : गणपतराव देशमुखांच्या नातवांचे पार्सल पेनूरला परत पाठवू, आमदार शहाजीबापू पाटील यांची गर्जना
attack on jalgaon resident deputy collector by sand mafia
वाळूमाफियांचे वाहन जळगाव निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी अडवले, अन घडले भयंकर
Yavatmal district murders
दोन खुनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला; आर्णीत जावयाकडून सासऱ्याची हत्या, पांढरकवडात तरुणाला संपविले

गिरीपेठ भागातील अतिरिक्त आयुक्त कार्यालयात हा गौरवसमारंभ पार पडला. समाजाने नाकारलेल्या १२७ मुलींसोबत मालाचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहात जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द व मेहनतीच्या बळावर मालाने शिक्षणाचा प्रवासही सुरू ठेवला. अमरावती येथील प्रतिष्ठित विदर्भ ज्ञान, विज्ञान महाविद्यालयातून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी पूर्ण केली. यानंतर २०१९ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. १२ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. हे कळताच ठाकरे यांनी तिला कार्यालयात बोलावून तिचा सत्कार केला. याप्रसंगी मालाने यशाचे श्रेय शंकरबाबा पापळकर, युनिक अकॅडमी अमरावतीचे प्रा. अमोल पाटील आणि मालाच्या उच्च शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या प्रकाश टोपले यांना दिले. याप्रसंगी वझ्झर येथील अनाथ आश्रमातील वार्डन वर्षा काळे, मालाच्या मैत्रिणी ममता, वैशाली, पद्ममा आणि शिवकुमार पापळकर, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी, डॉ. नरेंद्र कोडवते, दिनेश शेराम, माहिती व जनसंपर्क खात्याचे समन्वयक अनिल गडेकर आणि इतरही उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inspiring story orphan blind girl manas orphan daughter of shankar baba papadkar succeeds in mpsc exam mnb 82 zws

First published on: 14-09-2023 at 09:46 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×