बुलढाणा : दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शेगाव क्लासिक २०२६ या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी आपली ताकद, मेहनत, शिस्त आणि सौष्ठवकला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत नागपूर, चंद्रपूर चे वर्चस्व दिसून आले.
या स्पर्धेत योगेश शेंडे (नागपूर) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकावला.आपल्या प्रभावी पोझिंगमुळे बेस्ट पोझर पुरस्कार गिरिराज काळे (नागपूर) यांना मिळाला, तर सातत्यपूर्ण मेहनत व प्रगतीसाठी बेस्ट इम्प्रोव्हमेन्ट पुरस्कार अब्दुल फारुख (वाशिम) यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा रसिकाचा उत्साही प्रतिसाद मिळालेल्या या
स्पर्धेतील वजनगटानुसार विजेते पुढीलप्रमाणे आहे.
० ते ५५ किलो वजनगटात
प्रथम अनुप वारके (नागपूर), द्वितीय उपशंकर विठ्ठल ताठे (बुलढाणा),
तृतीय रहेमान खान (अकोला), चतुर्थ निशिकांत गेडाम (चंद्रपूर),
पंचम – जय भोकरे (चंद्रपूर).५५ ते ६० किलो वजनगटात प्रथम प्रविण बुथे (वाशिम),
द्वितीय शेख नावेद (बुलढाणा), तृतीय प्रफुल घाटबांडे (चंद्रपूर),
चतुर्थ राहुल बनसोड (चंद्रपूर),पंचम सैय्यद आरिफ (वर्धा).६० ते ६५ किलो वजनगटात
प्रथम गिरिराज काळे (नागपूर), द्वितीय राहुल बागडे (नागपूर),तृतीय अब्दुल साकिब (अकोला),
चतुर्थ करण दरखडे (नागपूर),पंचम धनंजय (शेगाव).
वुमन्स फिजिक्स स्पर्धा
याचवेळी पार पडलेल्या शेगाव वुमन्स फिजिक्स स्पर्धेत महिलांच्या फिटनेस आणि ताकदीचे प्रभावी प्रदर्शन झाले. या स्पर्धेत प्रथम सपना भरडे, द्वितीय सुनिर्धा प्रितम शाह, तृतीय राजसी राजू लांजेवार,चतुर्थ स्वाती तामगाडगे, पंचम मिताली विलायतकर.
‘शेगाव टॉप टेन‘ मध्ये क्रमानुसार खालील खेळाडूंचा समावेश आहे
धनंजय राऊत, शिवशंकर शेगोकार, मोहम्मद इतिहास, राहुल वाकोडे, आकाश बारगड, प्रमोद वानखडे , आसिफ खान, अभय शेगोकार, मोहम्मद रफीक, नागेश पवार. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊली ग्रुपचे ज्ञानेश्वर पाटील हे होते. मार्गदर्शक म्हणून माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल, शैलेंद्र पाटील, पांडुरंग बुच व वसुदेव राठोड,श्रीधर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी शेगाव पालिका अध्यक्ष प्रकाश शेगोकार गजानन जवंजाळ, पवन महाराज शर्मा, विनोद मसने, बाळू घोरडे,विनोद घुले,विक्रांत पाटील, नानाराव पाटील, डॉ.अविनाश सोळंके, महेश काळे ,राजेश पारखडे, डॉ.मयूर वाडे, अमोल चव्हाण ,सुधीर उगले, गणेश बुलकुडे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हाके यांनी केले.

