Premium

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीला विमानतळावरून अटक

कुणाल सचदेव असे क्रिकेटची सट्टेबाजी करणाऱ्याचे नाव असून त्याचे विदेशातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींसोबत व्यावसायिक संबंध आहेत.

international cricket better arrested airport
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीला विमानतळावरून अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची सट्टेबाजी खेळणाऱ्या क्रिकेट बुकीला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ सापळा रचून अटक केली. कुणाल सचदेव असे नाव असून त्याचे विदेशातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींसोबत व्यावसायिक संबंध आहेत. कुणालला अटक करताच नागपुरातील लकडगंज, खामला, जरीपटका, तहसील, कोतवाली, अंबाझरी आणि सदर परीसरात बसणाऱ्या बुकींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल सचदेव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिगत राहून क्रिकेटची बेटिंग करतो. त्याने क्रिकेट सट्टेबाजीची सुरुवात नागपुरातून केली होती. कोट्यवधी रुपयांची कमाई केल्यानंतर त्याने दिल्लीतून आंतरराष्ट्रीय बुकींशी व्यवहार सुरु केला होता. महाराष्ट्रातील ‘टॉप-५’ क्रिकेट बुकींमध्ये कुणालाची गणना होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्याने दिल्लीतून देशातील अनेक राज्यातील क्रिकेट बुकींची खायवाडी-लगवाडी करीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्याने केली.

हेही वाचा… विकृतीचा कळस! भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

आज तो मुंबईवरून नागपूरला येणार होता, अशी माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. तो दुपारी विमानतळावर येताच पोलिसांनी सापळा रचला. त्याला विमानतळ परीसरातूनच अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे किशोर पर्वते यांनी जामठा क्रिकेट मैदानावरून चार क्रिकेट सट्टेबाजांना अटक केली होती. त्या सट्टेबाजांचासुद्धा संबंध कुणाल सचदेव यांच्याशी आहे. त्यामुळे आता त्या गुन्ह्यातसुद्धा कुणालला अटक होणार आहे.

हेही वाचा… महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; पाहा कोणत्या जिल्ह्यात मुसळधार…

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील क्रिकेट बुकींवर कठोर कारवाई केल्यानंतर अनेक सट्टेबाजांनी शहर सोडले होते. मात्र, कुणालने काही सट्टेबाजांना नागपुरातून सट्टेबाजी करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यामुळे कुणालच्या अटकेमुळे क्रिकेट सट्टेबाजांची भंबेरी उडाली आहे. कुणालला अटक होताच काही सट्टेबाजांनी तत्काळ शहर सोडून पळ काढल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: International cricket better arrested at airport adk 83 dvr

Next Story
बुलढाणा : मंडप सजला, आंतरपाट धरला, अक्षता पडणार इतक्यात ‘ऑटो’ धडकला! वऱ्हाड्याचा मृत्यू , एक जखमी, सजनपुरीमध्ये तणाव