सिंचन गैरव्यवहार : महाराष्ट्रासह १५ ठिकाणी कारवाई

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील नेरला (पाघोरा) उपसा सिंचन योजना आणि घोडाझरी कालव्यातील गैरप्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील दहा माजी अधिकाऱ्यांसह तीन कंत्राटदार कंपन्यांच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, एसीबीच्या १५ विविध पथकांनी एकाच वेळी महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेशासह विविध ठिकाणी छापे घालून या सर्वांची घरे आणि कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द प्रकल्पातील ४० कंत्राटांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. तपासादरम्यान घोडाझरी कालव्याच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शासनाला तब्बल ८ कोटी ८१ लाख ३९ हजार रुपयांचा फटका बसला.

नेरला (पाघोरा) उपसा सिंचन योजनेच्या पेंढरी शाखा कालव्याच्या कामातही १५ कोटी ४९ लाख १९ हजार रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे निदर्शनात आले.

या प्रकरणी एसीबीने घोडाझरी कालव्याचे काम करणारी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे दोन अधिकारी आणि नेरला उपसिंचनाचे काम करणारी मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्री आर बलरामी रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या एकूण दहा माजी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.

नेरला सिंचन योजनेतील प्रभाकर मोरघडे (तत्कालीन कार्यकारी अभियंता), श्याम आंबुलकर (तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी), दिलीप पोहेकर (तत्कालीन अधीक्षक अभियंता), सोपान सूर्यवंशी (तत्कालीन मुख्य अभियंता),           रोहीदास मारुती लांडगे (तत्कालीन कार्यकारी संचालक), बोल्लीनेनी वैंकटा रामराव (भागीदार, मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन), रामीरेड्डी श्रीनिवासुला रेड्डी (तत्कालीन व्यवस्थापक, श्री. आर. बलरामा रेड्डी कंपनी) यांच्यावर तर घोडाझरी शाखा कालवा प्रकरणात रमेश वर्धने (तत्कालीन कार्यकारी अभियंता), गुरुदास मांडवकर (सेवानिवृत्त वरिष्ठ विभागीय लेखापाल), संजय खोलापूरकर (तत्कालीन अधीक्षक अभियंता), सोपान सूर्यवंशी (सेवानिवृत्त मुख्य अभियंता), देवेंद्र शिर्के, (सेवानिवृत्त कार्यकारी संचालक (वि. पा. वि. म.), शामकांत धर्माधिकारी, (मे. हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन कंपनी), सुनील शिंदे, (में. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

दोन्ही प्रकरणांत २३ कोटी ३० लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे येत आहे. त्यावरून त्यावेळच्या अधिकाऱ्यांसह तीन कंपन्यांतील ४ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांच्या घरांसह कार्यालयांवर रविवारी एकाच दिवशी छापे घालण्यात आले. याबाबत आणखी तपास सुरू आहे. – संजय दराडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर</strong>