नागपूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अनेक अशक्यप्राय अंतराळ मोहिमा, अभियान यशस्वीपणे राबवल्या आहेत. डीटीएच सेवा, हवामानाचा अंदाज वर्तवणे हे उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले आहे. इस्रोच्या मोहिमा व अभियानाचा उद्देश हा सर्वसामान्यांना उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यास प्राधान्य देणाऱ्या आहेत, असा सूर आजच्या परिसंवादात सहभागी वैज्ञानिकांनी व्यक्त केला.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले परिसरात ‘अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान’या विषयावर चर्चासत्र आयोजन करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सचिव एस. सोमनाथ, अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक प्रा. अनिल भारद्वाज, इस्रोचे सायंटिफिक सचिव डॉ. शंतनु भातवडेकर, डायरेक्टोरेट ॲाफ टेक्नॅालॅाजी डेव्हलपमेंट अँड असोसिएट सायंटिफिकचे संचालक डॉ. व्हिक्टर जोसेफ टी., ह्युमन फेसफ्लाईट अँड ॲडव्हान्स टेक्नॅालॅाजी एरिया स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे उपसंचालक डॉ. डी.के. सिंग या चर्चासत्रात सहभागी झाले.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

हेही वाचा >>> ‘इस्त्रो’च्या अंतराळ प्रवासाचे दर्शन घडवणारी ‘स्पेस ऑन व्हिल्स’; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

एस. सोमनाथ म्हणाले की, अंतराळ तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. कोरोनाच्या काळात जग थांबले असताना शंभरावर अंतराळ मोहीमा राबविण्यात आल्या. देशातही अंतराळ क्षेत्राशी संबंधित शंभरावर स्टार्टअप पुढे आले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुसह्य करीत देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावण्याचा इस्रोचा उद्देश असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अनिल भारद्वाज म्हणाले की, यंदा मंगलयान-३ आणि आदित्य एल-१ या अंतराळ मोहिमा राबवण्यात येणार आहे. यापूर्वी राबवण्यात आलेली मंगलयान ही मोहीम जगातील सर्वात कमी खर्चिक मोहीम होती.

हेही वाचा >>> औरंगजेब मुद्द्यावरुन नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाड यांना पत्र, म्हणाले “मुंब्रारक्षक….”

डॉ. शंतनू भातवडेकर यांनी इस्रोच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, शेती व शेतीपूरक व्यवसायांना फायदेशीर ठरणारे तंत्रज्ञान निर्मिती करण्याकडे इस्रोने लक्ष केंद्रित केले आहे. देशाला ७५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून सुमारे ७० लाख लोकांचे जीवन हे मासेमारीवर अवलंबून आहे. मासेमारी या शेतीपूरक व्यवसायास सहाय्यभूत ठरणारे तंत्रज्ञान निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागासोबत मिळून वादळाची पूर्वकल्पना देणे हा त्याचाच एक भाग आहे. अस्मानी आपत्तींची माहिती उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. व्हिक्टर जोसेफ टी. म्हणाले की, इस्रोमार्फत आतापर्यंत २०८ मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. २०२४-२५ मध्ये गगनयान ही मोहीम राबवण्यात येणार आहे. कृषी, मनुष्यबळ विकास, क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले.

डॉ. डी.के. सिंग म्हणाले की, वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अंतराळातील सॅटेलाईटच्या सहाय्याने हे शक्य झाले आहे. याचे अनेक फायदे आहेत. वायरलेस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध होऊ शकते.