चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवरत्न स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (भारतीय अवकाश संशोधन केंद्र) बंगळुरू येथे सहलीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सहलीवर विरजण पडले आहे. शिक्षण विभागाने रेल्वे आरक्षण न केल्याने ३५ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत येऊन स्वगावी हिरमुसल्या चेहऱ्यांनी परतावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी नवरत्न स्पर्धेचे आयोजन केले जाते. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रातदेखील ही स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाबाबत अभ्यास करता यावा, या दृष्टीने शिक्षण विभागाने इस्रो सहलीची नावीण्यपूर्ण संकल्पना राबविली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थीसुद्धा आनंदीत झाले.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

हेही वाचा – नागपूर: राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार; सुधीर मुनगंटीवार

नवरत्न स्पर्धेत विजय मिळविलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या केंद्रात जाण्याची आस लागून असताना शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन केले जात होते. त्यानुसार २४ ते २९ मार्च यादरम्यान सहलीचे नियोजन केले. मात्र, ३५ विद्यार्थी व ७ अधिकारी आणि कर्मचारी एकाचवेळी जात असताना ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण झाले नसल्याने शिक्षण विभागाला ही सहल रद्द करावी लागली.

विशेष म्हणजे, सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत बोलाविण्यात आले होते. मात्र रेल्वे आरक्षण अभावी विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागले. नवरत्न स्पर्धेसाठी शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून परिश्रम घेत असतात. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसोबत जाण्याची संधी त्या शिक्षकांना मिळणे अपेक्षित असते. परंतु, इस्रोच्या सहलीसाठी परिश्रम घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांना डावलून इतरांना सोबत पाठविण्याचे नियोजन केले होते. यावरही काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले असून, शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही बसला आहे.

हेही वाचा – नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

येत्या काही दिवसांतच पुन्हा या सहलीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेचे आरक्षण मिळाले नसल्यामुळे ऐनवेळी ट्रॅव्हल्सने जाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बंगळुरूपर्यंतचा प्रवास मोठा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ही सहलच रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.