वर्धा : अल्लीपुर येथील एका घरी युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. श्यामल उत्तमराव वैद्य, २१ असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या कथित प्रियकरावर संशय व्यक्त होत आहे.

येथील जयभीम वार्डात राहणाऱ्या वैद्य कुटुंबातील श्यामल ही यवतमाळ येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. सलग सुट्ट्या आल्याने ती घरी आली होती. घरी घटना घडली तेव्हा आईवडील दोघेही घराबाहेर असल्याने ती एकटीच घरी होती. कुटुंबीय घरी आले तेव्हा श्यामलचा मृतदेह घरी संशयास्पद स्थितीत पडून होता. पोलिसांना सूचित करण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी येत चौकशी सुरू केली. गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – नागपुरातील पुरात नुकसान झालेल्यांना फडणवीसांकडून मदतीची घोषणा; म्हणाले, “चिंतेची बाब एवढीच की…”

हेही वाचा – स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे १० हजार कामगारांवर बेरोजगारीचे विघ्न; मीटर रिडिंग, देयक वाटप बंद होणार

ही घटना घडली तेव्हा एक युवक घरी आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. श्यामल घरी एकटी असल्याचे पाहून तो घरी येत वाद करायला लागला. वाद विकोपस गेल्यावर त्याने खून केल्याचे म्हटल्या जाते. प्रियकरानेच हा खून केल्याचे स्पष्ट असून त्याला लवकरच अटक केल्या जाईल, असे अल्लीपूर पोलिसांनी नमूद केले आहे.

Story img Loader