scorecardresearch

Premium

गोंदिया : ईटियाडोह धरण ओव्हरफ्लो; सतर्कतेचा ईशारा

अर्जुनी मोर तालुक्याचे वैभव असलेले ईटियाडोह धरण आज २१ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता ओव्हरफ्लो झाले.

Itiadoh Dam overflow
गोंदिया : ईटियाडोह धरण ओव्हरफ्लो; सतर्कतेचा ईशारा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्याचे वैभव असलेले ईटियाडोह धरण आज २१ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेला ईटियाडोह परिसर पावसाळ्याच्या दिवसात अधिकच खुलून दिसते. संपूर्ण मातीकामाने तयार करण्यात आलेला इटियाडोह धरण गाढवी नदीवर बनविण्यात आलेला आहे. सुट्ट्यांच्या दिवसात हजारो पर्यटक या धरणाला भेट देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे.

15 villages najar paisewari above 50 paise
गोंदिया : ९१५ गावांची नजर पैसेवारी ५० पैशाच्या वर, अतोनात नुकसान तरीही…
Burning Bus on samruddhi highway
समृद्धीवर ‘बर्निंग बस’चा थरार! चालत्या ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग, पुढे झाले असे की…
water storage in increase in itiadoh dam
गोंदिया: इटियाडोह धरण ‘ओव्हर फ्लो’च्या उंबरठ्यावर! दमदार पावसामुळे ९५ % पाणीसाठा
block 2 october Dedicated freight corridor panvel station CSMT Panvel local timatable changed mumbai
ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; सीएसएमटी – पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता

हेही वाचा – अकोला : कृषी विद्यापीठात २० एकरावर साकारणार जिवंत पीक प्रात्यक्षिके; एकाच ठिकाणी २१० विविध पिकांच्या जाती, यंदा प्रथमच शिवार..

हेही वाचा – विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…

सन २०१३ नंतर तब्बल सहा वर्षांनी सन २०१९ ला आणि मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ ला इंटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता २१ सप्टेंबर २०२३ ला पहाटे सहा वाजता इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण पर्वताच्या मधोमध आहे. धरणापासून भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे धरण म्हणूनही प्रख्यात आहे. पर्यटकांनी नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयाच्या सांडव्यावरून ओव्हर फ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो, त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अशी सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Itiadoh dam overflow a note of caution sar 75 ssb

First published on: 21-09-2023 at 17:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×