scorecardresearch

विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक

आर्थिक, सामाजिक सुरक्षेचा मुद्दा दिशाभूल करणारा

Naxalist arrested
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील रहिवासी साईनाथ नरोटे या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात आली. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे (२७) रा.मर्दहूर,ता. भामरागड असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’) साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. ९ मार्चच्या रात्री भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर या गावचा सुशिक्षीत युवक साईनाथ नरोटी याची नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेत नक्षली प्रकाश उर्फ देविदास गावडे व अन्य दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काल त्याला अटक करण्यात आली.

आणखी वाचा- Old Pension Scheme : संपाबाबत शासनाने स्थापन केलेल्या समितीवर कर्मचारी संघटनेचा आक्षेप; आर्थिक, सामाजिक सुरक्षेचा मुद्दा दिशाभूल करणारा

नक्षली प्रकाश गावडे हा मार्च २००० मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याची उत्तर गडचिरोली-गोंदिया विभागातील प्लाटून दलममध्ये बदली करण्यात आली. २००७-०८ मध्ये तो सेक्शन डेप्युटी कमांडर झाला. २००९ नंतर त्याने प्लाटून सेक्शन ‘ए’ आणि देवरी दलमचा कमांडर म्हणून काम केले. त्याच्यावर खुनाचे १०, चकमक ८, दरोडा १, जाळपोळीचे २ व अन्य १ असे २२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. साईनाथ नरोटीच्या हत्येत सहभागी असलेल्या अन्य दोन नक्षलींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 09:49 IST
ताज्या बातम्या