बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय जालना येथून बुलढाण्याकडे रवाना झाले आहे. जरांगे परिवार बुलढाण्यात आज आयोजित मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी होणार आहे.
बुलढाणा येथील आंदोलनात जरांगे परिवाराने सहभागी व्हावे यासाठी आयोजकांनी दोन दिवसांपासून जोरदार प्रयत्न चालविले होते. काल रात्री काही मंडळी वाहनासह जालन्यात ठाण मांडून होती. त्यांच्या प्रामाणिक धडपडीला अखेर यश आले. आज सकाळी समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे हे कुटुंब आज बुधवारी सकाळी बुलढाण्याकडे रवाना झाले. ते मोर्च्यात सहभागी होणार असून मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जिल्ह्यातील समाज बांधवांशी संवाद साधणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.