Premium

जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय जालना येथून बुलढाण्याकडे रवाना झाले आहे.

Jarange family Buldhana
जरांगे कुटुंबीय जालन्याहून बुलढाण्याकडे रवाना, मराठा आरक्षण क्रांती मोर्च्यात होणार सहभागी (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय जालना येथून बुलढाण्याकडे रवाना झाले आहे. जरांगे परिवार बुलढाण्यात आज आयोजित मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भंडाऱ्यातील दहीहंडी दुर्घटनेप्रकरणी नाना पटोलेंनी केली ‘ही’ मागणी; म्हणाले, “प्रकरण दाबण्याचा…”

हेही वाचा – धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन प्रेयसीच्या मुलाचा अनन्वित छळ; विकृत प्रियकराला पोलीस कोठडी

बुलढाणा येथील आंदोलनात जरांगे परिवाराने सहभागी व्हावे यासाठी आयोजकांनी दोन दिवसांपासून जोरदार प्रयत्न चालविले होते. काल रात्री काही मंडळी वाहनासह जालन्यात ठाण मांडून होती. त्यांच्या प्रामाणिक धडपडीला अखेर यश आले. आज सकाळी समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे हे कुटुंब आज बुधवारी सकाळी बुलढाण्याकडे रवाना झाले. ते मोर्च्यात सहभागी होणार असून मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जिल्ह्यातील समाज बांधवांशी संवाद साधणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jarange family leaves for buldhana from jalana will participate in maratha reservation kranti march scm 61 ssb

First published on: 13-09-2023 at 13:06 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा