नागपूर: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एकूण ९४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा लागणार आहे. भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये होणारी ही भरती डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी होणार आहे.

Chandrapur assembly Constituency congress candidate Praveen Padvekar
काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा – फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”

हा अनुभव असणे आवश्यक

पदभरतीसाठी विविध नियम देण्यात आले आहेत. यात शैक्षणिक पात्रता: एओसीपी ट्रेडचे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे त्यांना अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना सुरुवातीला त्यांची पात्रता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले एओसीपी ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. किंवा एनसीटीव्हीटीद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून एओसीपी ट्रेडमध्ये आणि सरकारी आयटीआयमधून एओसीपी असलेले उमेदवार विचारात घेतले जातील.

या नियमांकडे दुर्लक्ष करू नका

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते ३५ वर्षे (एससी, एसटी! ५ वर्षे वयामध्ये सूट, ओबीसी ३ वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : मोफत
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ नोव्हेंबर २०२४

हेही वाचा – वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

आरबीआय बँकेत डेप्युटी गव्हर्नर पदासाठी भरती

वित्त मंत्रालयाने आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाकरिता भारत सरकारात सचिव किंवा समकक्ष पदावर २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे. निवडलेल्या उमेदवाराला २.२५ लाख रुपये मासिक पगार मिळेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला भारत सरकारमध्ये सचिव किंवा त्या समांतर पदाचा काम केल्याचा अनुभव असणे अपेक्षित आहे. तसेच संबंधित उमेदवाराला लोक प्रशासनात कमीत कमी २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थानमध्ये कमीत कमी २५ वर्षे काम केल्याचा अनुभव असला पाहिजे. तसेच उमेदवारांचे वय हे ६० वर्षांपेक्षा जास्त असू नये. हे पद ३ वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला दर महिन्याला २.२५ लाख रुपये पगार मिळेल.

Story img Loader