नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी पुन्हा शुद्धिपत्रक जाहीर करून त्यामध्ये ‘कुणबी नोंदी’च्या आधारे इतर मागासवर्गाचे (ओबीसी) जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी दिली आहे.त्यामुळे पूर्व परीक्षा आता ६ जुलै ऐवजी २९ जुलैला घेण्यात येईल. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे ‘एमपीएससी’ने हा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला.

परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ‘एमपीएससी’ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी ९ मे रोजी शुद्धिपत्रक काढून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले. २९ डिसेंबर २०२३च्या जाहिरातीमध्ये २५० जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली.

Application in EWS category even after Maratha reservation
मराठा आरक्षणानंतरही अर्ज ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच! परीक्षेनंतर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता
inquiry committee formed by tuljabhavani temple administration
तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरण: त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत, लोकसत्ताच्या वृत्तानंतर मंदिर प्रशासनाची कारवाई
technical difficulties while filling online application for ladki bahin scheme zws
लाडकी बहीण योजनेचे आॕनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी 
ambadas danve
“विधान परिषदेत खेळाडूंऐवजी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव”, अंबादास दानवेंचा आरोप; म्हणाले, “आम्हाला…”
ajit pawar value added tax
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत, अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील ‘या’ तरतुदीमुळे चर्चेला उधाण!
non creamy layer, candidates,
‘एमपीएससी’ देणाऱ्या महिला उमेदवारांना दिलासा, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ची अट रद्द
dr abhay bang, dr abhay bang express their thoughts on alcohol ban, dr Abhay bang lecture, former ias officer sharad kale , former ias officer sharad kale s first memorial, Talk in memory of late Shri Sharad Kale, marathi news, Mumbai news,
महाराष्ट्राला दारूबंदी नव्हे तर दारू नीतीची गरज, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित

हेही वाचा >>>भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाच जणांवर उपचार सुरू

त्यामुळे मराठा उमेदवारांना मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर काही उमेदवारांनी त्यांच्याकडील ‘कुणबी नोंदी’च्या आधारे ‘इतर मागासवर्गा’चे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी इतर मागास वर्गाचा पर्याय सादर करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार शासनाने २८ मे रोजी दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांचा इतर मागास वर्गाचा दावा मान्य करून तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>“यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

अर्ज कुणाला करता येणार?

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरिता पर्याय सादर करणे, तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वय अधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांनाच नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.