नागपूर : जुनोना जंगलात वन्यजीवांच्या अपघाताचे सत्र थांबता थांबेना. जुनोना – पोंभुर्णा रस्त्यावर भर दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाला.

जखमी सांबराचा मृत्यू

ही घटना कक्ष क्रमांक ४६७ मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात घडली आहे. बचाव कार्य सुरु असतांनाच सांबराचा गंभीर जखमानमुळे वाटेतच मृत्यू झाला. अपघातात सांबराचा पुढील उजवा पाय व मागील पाय तुटले होते, जबडा तुटलेला होता, छातीमध्ये पोटामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव त्याच्या मृत्यू झाल्याचा अंदाज डॉ. कुंदन पोडचालवार यांनी सांगितले.

आतापर्यंत ४० हुन अधिक प्राणी

जुनोना -पोंभुर्णा रस्त्यावर आत्तापर्यंत ४०च्या जवळपास वण्यप्राणी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आहे त्याच्या नोंदी शात्रीय पद्धतीने हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी ठेवत असून लवकरात लवकर उपाय योजना राबविण्यात याव्या असे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करून सांगितले आहे. चालू वर्षात सात वन्यप्राण्यांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्यात बिबट,दोन सांबर, चितळ, मसण्याऊद,कंठेरी शिंगळा घुबड, मुंगुस यांचा समावेश आहे.

रस्त्याला आधीच विरोध

ह्या रस्त्याच्या रुंदीला हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी ने विरोध केला होता, कारण जुनोना जंगल हे एका महत्वाच्या भ्रमणमार्गात येत असून भरपूर प्रमाणात वन्यजिवांची हालचाल आपल्याला बघावयास मिळते. रस्त्याची रुंदी वाढविल्याने वाहणाचा वेग वाढेल, परिणामी वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, समजा रस्त्याचे रुंदीकरण वाढवणार असाल तर, वेगावर नियंत्रण साठी उपाय योजना म्हणून स्पीड ब्रेकर अथवा बॉक्स कलवर्ट ची निर्मिती, उपशमन योजना करण्यात यावी, संध्याकाळी सहा नंतर हा रस्ता बंद करण्यात यावा हे सुचवीण्यात आले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फक्त तोंडी आश्वासन देऊन रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या जोमात करण्यात आले, आता त्याचे परिणाम वन्यजीवांना भोगावे लागत आहे.

अनेक वन्यप्राणी जखमी

ह्या रस्त्यावर जुनोना जवळ वाघ, अस्वल, बिबट, चितळ, मसण्याऊंद, रानमांजर, सांबर, सरीसृप, नुकताच कारव्याकडे एक रानगवा एका पायाने लंगडत असतांना बघितले. रस्ता सुरक्षा समितीला जुनोना रस्त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता, नुकताच बिबट्याचा अपघात झाला तेव्हा सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले यांना हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी कडून पत्र देण्यात आले. पण त्या पत्राचे अद्यापही उत्तर मिळाले नाही, आता एखाद्या वाघाचा अपघात झाल्यावरच यांना जाग येणार आहे का? हेच कळायला मार्ग नाही.

कार्यकारी अभियंत्याला माहिती

नुकतीच कार्यकारी अभियंता श्री. टांगले साहेबांची भेट घेऊन रस्ते अपघातात ४० च्या वर वण्यजिवांना जीव गमवावा लागला आहे याची माहिती देण्यात आली. त्यांनी पुढील कारवाईचे आश्वासन देऊन, जिथे गरज आहे असे ठिकाण आमच्या विभागाला कळवीण्यात यावे, नंतर रस्ता सुरक्षा समिती व हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी सोबत वनविभागसोबत मिळून एक सर्वे करून उपशमन योजना राबवू असे त्यांच्या विभागतर्फे सांगण्यात आले सांगितले.

घटनास्थळी सर्वच

घटनेची माहिती हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे सदस्य कुणाल पुरके यांनी दिली लगेच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली व लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली. घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी अध्यक्ष दिनेश खाटे, सदस्य अनिकेत वनकर, अभिषेक गजबे, इमरान पठाण वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मेश्राम, वनपाल जुनोना, बी ए पांचाळ वनपाल, जी बी लुटे वनरक्षक, एस एस पंधरे वनपाल व शवविच्छेदन कुंदन पोडचालवार यांनी केले. यावेळी वनमजूर उपस्थित होते.