नागपूर : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाते हे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक संघर्ष सातत्याने सुरू असतो. नागपूर मध्ये अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित होते. न्या. गवई यांनी फडणवीस मंचावर उपस्थित असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले.
काय म्हणाले सरन्यायाधीश?
२०१४ साली भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या लढल्या तरी नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर शिवसेना सत्ता भागीदार बनली. या काळात दोघांमध्ये काही मतभेद असूनही सहकार्याचे नाते होते. मात्र २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली, पण मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला.

शिवसेनेने भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले आणि ते खुले राजकीय विरोधक बनले. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, आणि फडणवीस यांनी भाजपकडून शिंदेंना पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध अधिकच कटु झाले.

आज त्यांचे नाते हे पूर्णपणे राजकीय संघर्षाचे असून, महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांचे संघर्षमय नाते हेच केंद्रबिंदू ठरले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये एका झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश यांनी एकदा नव्हे तर किमान तीन चार वेळा उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आणि कौतुक केले. न्या. गवई यांनी नागपूर मध्ये स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या निर्मितीबाबत गोष्ट सांगितली. या विधी विद्यापीठाचे २०१६ साली भूमिपूजन झाले तेव्हा देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळात विद्यापीठाला भरपूर निधी दिला गेला. मात्र नंतर २०१९ मध्ये त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आले. या वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात देखील उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधीची कमतरता होऊ दिली नाही, अशा शब्दात न्या. गवई यांनी ठाकरे यांचे कौतुक केले. न्या. गवई यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील गमतीशीर भाष्य केले. विधी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, दुसऱ्या वेळी ते विरोधी पक्ष नेता होते, त्यानंतर तिसऱ्या वेळी ते उपमुख्यमंत्री म्हणून विद्यापीठ कार्यक्रमात उपस्थित राहिले, आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमात उपस्थित आहेत, असे न्या. गवई म्हणाले.