शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनापासून मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबले आहे. मध्यंतरी सुपरला ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ मिळाले. त्यानंतर प्रत्यारोपणासाठी प्रयत्नही झाले. परंतु, एका दानदात्याचा अपघात तर इतरही रुग्ण वा नातेवाईकांबाबत समस्या निर्माण झाल्याने येथील प्रत्यारोपणाची समस्या सुटताना दिसत नाही.

हेही वाचा >>>नागपूर: समलैंगिक विवाहांमुळे भारतीय संस्कृतीला धोका नाही! डॉ. सुरभी मित्रा यांची ग्वाही

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
pune sassoon hospital marathi news, sassoon hospital latest marathi news
पुणे: ससूनमध्ये केवळ चौकशीचा ‘खेळ’! केवळ समित्या नेमून अहवाल सादर करण्याची घाई
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सुपरस्पेशालिटीतील मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्णांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारानेच येथे कंत्राटी सहयोगी प्राध्यापक म्हणून एक ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ रूजू झाले. या प्रक्रियेनंतर येथे चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा तीन रुग्णांची चाचपणीही झाली. या रुग्णांच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंड दान देण्याची तयारी दर्शवण्यात आली, बऱ्याच तपासण्यासह कागदपत्रांचीही पूर्तताही केली गेली.

हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मे महिन्यात

दरम्यान, नवीन ‘नेफ्रोलाॅजिस्ट’कडूनही काम सुरू झाले. बघता-बघता काही दिवसांतच सात रुग्णांची नोंद झाली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तयारी पूर्ण झाल्यावर सुपरच्या डॉक्टरांकडून पहिल्या प्रतीक्षा यादीतील रुग्णाला भ्रमणध्वनी करण्यात आला. परंतु, त्याला दान देणाऱ्याचा अपघात होऊन पायाचे हाड मोडल्याचे पुढे आले. त्यामुळे प्रत्यारोपणाची प्रक्रिया पुढे गेली.

दुसऱ्या प्रकरणात गडचिरोलीतील रुग्णाचा पाठपुरावा सुरू असून भंडारातील एका रुग्णासाठी मध्यंतरी मेंदूमृत रुग्णाचे अवयव उपलब्ध असल्याचे पुढे आले. परंतु, हे मूत्रपिंड दिलेली व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असल्याने गुंतागुंतीची समस्या बघता रुग्णाने प्रत्यारोपणास नकार दिला. २०२० ते २०२१ दरम्यान मेंदूमृत रुग्णाकडून मिळालेल्या तीन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण येथे करण्यात आले होते, हे विशेष.