scorecardresearch

Premium

वर्धा: शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी किशोर सानप

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे २१ आणि २२ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे.

Kishore Sanap as the President of Farmer Literature Conference
शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी किशोर सानप

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे २१ आणि २२ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे.निमंत्रक गंगाधर मुटे यांनी याबाबत माहिती दिली. शेती अर्थशास्त्राच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी व साहित्य सारस्वतांची कृषी जगाशी सांगड घालून कर्तव्यासाठी प्रेरित करण्यासाठी हे संमेलन आयोजित केल्या जात असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रसंतांचे शेती साहित्यातील कृतिशील कार्य डोळ्यापुढे ठेवून हे आयोजन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरुकुंजला होत असल्याचे मुटे यांनी नमूद केले. डॉ. सानप संमेलनाध्यक्ष तर श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे स्वागताध्यक्ष असणार आहेत. नाशिकच्या शेती उद्योग समूह सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे हे उद्घाटक, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉ. रवींद्र शोभणे व राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: राहुल गांधींच्या जाहीर सभेसाठी आलेल्या वाहनांमुळे शेगावजवळ वाहतूक कोंडी

Nashik District Sahitya Sammelan Conference organized
नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी
ajit pawar rohit pawar ganpati darshan in pune
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात गणेश दर्शनावरून स्पर्धा
Rajnish Seths
एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?
Sanjay Raut
“मी महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक, इच्छा झाली तर…”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेबाबत संजय राऊतांचं वक्तव्य

शेतकरी आत्महत्यांचे विक्राळ रूप, ओला दुष्काळ, उत्पादनातील प्रचंड घट, गत पाच वर्षांपासूनची नापिकी, निर्विकार शासकीय मानसिकता,बळाने होणारा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार असे व अन्य विषय चर्चेला येतील. मराठी साहित्य विश्वाने याची दखल घेतली नाही. हे त्या विश्वाचा खुजेपण दाखविते. ही उणीव शेतकरी साहित्य संमेलन भरून काढणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी वर्धा, नागपूर, पैठण, अलिबाग, मुंबई व अन्य ठिकाणी अशी संमेलने पार पडली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kishore sanap as the president of farmer literature conference amy

First published on: 18-11-2022 at 14:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×