नागपूर : गेल्या साडेनऊ वर्षात औद्योगिक विकास न करता केवळ घोषणाबाजी करून जनतेला विशेषत: युवकांना भूलथापा देण्यात आल्या आणि त्याची पुढील टप्पा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार औद्योगिक महोत्सव आहे, असा आरोप महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांनी केला. २०१४ पासून विदर्भात किती उद्योग आले आणि त्यातून स्थानिकांना किती रोजगार मिळाले. याचा तपशील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेसमोर ठेवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

येत्या २७ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे विदर्भातील औद्योगिक वाढ सुलभ करणे, विदर्भात नवीन गुंतवणूक आकर्षित करणे, सध्या असलेल्या प्रश्नांबाबत उपाय व तोडगा सुचवणे, सरकार दरबारी उद्योगांचे प्रश्न मांडणे व व्यवसाय वाढीसाठी कार्यक्रम राबवणे असा सांगण्यात येत आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात विदर्भात फार मोठी गुंतवणूक होईल आणि विदर्भात विकासाची गंगा वाहणार आहे असे चित्र सर्वत्र निर्माण केले जात असल्याचे चे म्हणाले. यावेळी ॲड. अविनाश काळे, मधुसूदन रूंगटा, उपस्थित होते.

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

करारांचे पुनरावलोकन आवश्यक – माहेश्वरी

कोळसा, मँगनीज, लोहखनिज यासारखी प्रमुख खनिजे विदर्भात मोठी गुंतवणूक आकर्षित करू शकतात. वेगवान औद्योगिकरणासाठी कोळसा आणि भरपूर वीज असलेले विदर्भ प्रदेशाला गुंतवणुकीचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. विदर्भात मोठी गुंतवणूक यावी म्हणून गेल्या तीन वर्षांत स्वाक्षरी केलेल्या सर्व सामंजस्य करारांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जलद गतीने काम सुरू झाले पाहिजे, असे नैसर्गिक स्रोत अभ्यासक प्रदीप माहेश्वरी म्हणाले.

हेही वाचा : महिन्याच्या १ तारखेला पगार येणाऱ्यांना कधीच पैशाचं मूल्य कळत नाही – नितीन गडकरी

किती रोजगार मिळाले खुलासा नाही

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात महारोजगार मेळावा घेतला. त्यानंतर फलक लावून ११,०९७ युवकांना रोजगार दिल्याचा दावा केला. परंतु, या ११०७९ युवकांपैकी किती लोकांना कुठल्या प्रकारचे रोजगार मिळाले याबाबत कुठेही खुलासा केला नाही, असे रोंघे म्हणाले.