वर्धा : दहावीचा निकाल तर लागला, आता उत्सुकता आहे ती अकरावीच्या प्रवेशाची. पहिला टप्पा आटोपला. त्यात आतापर्यंत एक लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा अपेक्षित आहे. मात्र या बाबत अधिकृत घोषणा झाली नाही. या विषयीचे वेळापत्रक शनिवारी दुपारी तीन वाजता जाहीर केले जाणार आहे.

आठ जूनपासून प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरण्यास उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय ऑनलाईन प्रणालीतर्फे अकरावीचे प्रवेश केल्या जाणार आहे. सध्या पहिल्या फेरीचे नियोजन केले जात असून पुढील दोन फेऱ्यांचे नियोजन नंतर घोषित करणार असल्याचे अधिकारी सांगतात. अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या भागात विद्यार्थी कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरतात यावर त्यांचा प्रवेश अवलंबून असतो. म्हणून हा टप्पा केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थी व पालक यांच्यात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?