Premium

कोल्हापूरची दंगल सरकार पुरस्कृत! आमदार विजय वडेट्टीवार यांचा आरोप

कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

MLA Vijay Wadettiwar
वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारची देण असल्याचे म्हटले आहे.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारची देण असल्याचे म्हटले आहे.

वडेट्टीवार म्हणतात, कोल्हापुरची दंगल नियोजित होती. तिच्या संदर्भात सरकारकडे बोट निश्चितपणे जाईल. राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये निवडणुकी बाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. ते विरोधात गेल्यानंतर सरकारने राज्यात जातीय तेढ निर्माण करणे सुरू केले आहे. याचाच परिपाक कोल्हापूरची घटना आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या सरकारने विश्वास गमावला आहे. मतांचे विभाजन करण्याशिवाय दुसरा पर्याय या सरकार समोर नाही. तसेच मुंबई वसतिगृहात झालेली घटना दुर्देवी आहे. उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकार स्वत:च्या सुरक्षेसाठी लढत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 18:49 IST
Next Story
सावधान! शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?