साहित्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती पाहून प्रमुख पाहुणे भारावले
साहित्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती व नेत्रदीपक आयोजन पाहून साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी व प्रसिद्ध कवी कुमार विश्वास चांगलेच भारावून गेल्याचे दिसून आले. आपण आपल्या मराठी भाषेचा किती सन्मान करता हे पाहून आश्चर्य वाटते. मराठी परंपरेचा हा गौरव पाहून आनंद वाटतो, असे डॉ. तिवारी म्हणाले.
हेही वाचा >>>नागपूर: खंडणी उकळण्यासाठी ‘सायबर’ हल्ला, केंद्रीय सुरक्षा एजन्सीची पथके दाखल
तर, कुमार विश्वास यांनी भाषाविषयक इतके भव्य संमेलन यापूर्वी कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. समोरच्या रांगेत राजकीय पाहुणे व मागच्या रांगेतील साहित्यिक पाहून ते म्हणाले, मागच्या रांगेतील पुढे व पुढील रांगेतील मागे बसले पाहिजे. साहित्य हे राजकारणाच्या मागे राहिले तर ते नष्ट होते. साहित्याने दिशा द्यावी. शासन धोरणांच्या अंमलबजावणीत चुकत असेल तर त्यास खबरदार करण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी करावे. भारतात जेव्हा जेव्हा लोकशाहीला धक्के बसले तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राने देशाला दिशा दिली.