scorecardresearch

अमरावती : विजेचा सिमेंट खांब अंगावर‎ पडल्याने मजूराचा मृत्यू‎

वीज‎ वाहिनीचा सिमेंट खांब सरळ करत‎ असताना तो तुटून तरुणाच्या अंगावर पडला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू‎ झाला.

death 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अमरावती : वीज‎ वाहिनीचा सिमेंट खांब सरळ करत‎ असताना तो तुटून तरुणाच्या अंगावर पडला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू‎ झाला. ही घटना धनोरा फसी ते जयसिंगा मार्गावर घडली. मृत तरूण महावितरणने कंत्राट दिलेल्या एका खासगी कंपनीकडे‎ मजुरी काम करत होता. या प्रकरणी लोणी पोलिसांनी‎ एका व्‍यक्‍तीच्‍या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत उर्फ दीप‎ राधेश्याम गाठे (१९, रा. ढवलसरी) असे मृत तरुणाचे‎ नाव आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फसी‎ ते जयसिंगा मार्गावरील वासुदेव सैरिसे यांच्या शेतात ही‎ घटना घडली.

याप्रकरणी गौरव गाठे यांच्या तक्रारीवरून‎ लोणी पोलिसांनी दिनेश मनोहर‎ वसंतकार (रा. अकोला) याच्याविरुध्द सदोष‎ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत हा‎ महावितरणची निविदाधारक असलेल्या लक्ष्मी‎ एंटरप्रायजेस, अकोला या कंपनीसाठी मजुरीचे काम‎ करत होता. तो महावितरणच्या‎ बडनेरा उपविभागातील जयसिंगा शिवारात काम करत‎ होता. तेथील जुना विजेचा सिमेंट खांब दोरीने बांधून‎ सरळ करण्याकरिता ओढत होता. अचानक तो खांब‎ खालच्या बाजूने तुटून संकेतच्या तोंडावर पडला, त्यामुळे‎ तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळीच ठार झाला.‎

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या