नागपूर: नागपूर – मुंबई समृधी महामार्ग हा विदर्भाच्या समृध्दीचे प्रवेश व्दार ठरले, असा दावा सरकारकडून केला जातो. त्याचा प्रत्यय आता महामार्गालगत होत असलेल्या गुंतवणुकीतून येत आहे. नागपूरमध्ये महामार्गालगत मुंबईच्या मोठ्या उद्योग समूहाने रियल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भ औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने या क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न झाले.पण त्याला अपेक्षित यश आले नाही.
नागपूर – मुंबई समृधी महामार्ग निर्मितीचा उद्देश विदर्भाला मुंबईशी जोडणे हाच आहे. या महामार्गालगत नवशहरे विकसित केली जाणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. त्यांनी नागपूरमध्ये १०९ एकर जागा खरेदी केल्याचे जाहीर केले. ही जमीन संपादित करण्यात आली आहे. कनेक्टिव्हीटीमुळे या जागेला सोन्याची किंमत येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प नागपूर सारख्या देशाच्या मध्यवर्ती शहरासाठी मायक्रो मार्केट उभारण्यात खारगचा वाटा उचलेल. येथील गुंतवणूकदारांसाठी हा भविष्यासाठी उत्तम प्रकल्प ठरेल, असा विश्वास गोदरेज प्रॉपर्टीजकडून व्यक्त करण्यात आला.



