नागपूर: ‘हात नका लावू कानाला, भाव द्या धानाला’ आणि इतर नारे देत विरोधकांनी सलग दुसऱ्याही दिवशी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी आंदोलकांनी गळ्यात कापसाच्या माळ आणि तूर आणि धानाचे रोप सोबत आणले होते.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांनी परिसरात विधानसभेच्या पायरीपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “कापसाला भाव मिळालाच पाहिजे”, “धानाला भाव मिळालाच पाहिजे”, “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे”, “शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून मदत द्या”, “दाऊद और मिर्चीके दलालो को, जुते मरो”, “टक्केवारी सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय”, “शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी सरकार घेते टक्केवारी” असे नारे देण्यात आले.

हेही वाचा – ‘उमेद’च्या चिमुकल्यांना उच्च शिक्षण आणि बारामतीची सैर! आमदार रोहित पवार उचलणार भार

हेही वाचा – नवाब मलिक पुन्हा विधान भवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात, अजित पवार म्हणतात…

आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, अनिल परब, नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विकास ठाकरे आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते.

Story img Loader