लोकसत्ता टीम

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना प्रचाराकरीता उणेपुरे २१ दिवस मिळाले. या कालावधीत मतदारसंघात महायुतीकडून विविध नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असताना महाविकास आघाडीतील एकही बडा नेता प्रचाराकरीता का आला नाही, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
all-party feliciation Abdul Sattar chhatrapati sambhaji nagar
अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ

महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या उमेदवाराकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोपीचंद पडळकर, अभिनेता गोविंदा अशा अनेक बड्या हस्ती प्रचारात सहभागी झाल्यात. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांनी वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र दिसले. शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते यवतमाळ-वाशि लोकसभा मतदारसंघाच्या शेजारील मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता फिरत असताना या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सभा घेणे का टाळले, अशी चर्चा आता रंगली आहे.

आणखी वाचा-भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली

शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांनी लगतच्या अमरावती, वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकरीता संयुक्त सभा घेतली. उद्धव ठाकरे यांनी परभणी, नांदेड या मतदारसंघातही सभा घेतली. अगदी प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांच्या सभा विदर्भ, मराठवाड्यात सुरू होत्या. महाविकास आघाडीकडून नामांकन दाखल करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिममधे जवळपास चार सभा घेतल्या होत्या. परंतु, निवडणुकीच्या रणांगणावर प्रचारयुद्ध सुरू झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे सेनापती मतदारसंघात प्रचारासाठी का आले नाही, यावर आता चर्वितचर्वण सुरू आहे. येथील उमेदवाराच्या कार्यपद्धतीबाबत ‘मातोश्री’वर पोहोचलेल्या निरोपांमुळे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिमकडे पाठ फिरवली नाही ना, असे बोलले जात आहे.

शिवसेना उबाठातील स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरल तिसऱ्या फळीतील उपनेते, संपर्कप्रमुख यांच्या भरवशावरच महाविकास आघाडीच्या उमदेवाराने झुंज दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही देश व राज्य पातळीवरील एकही नेता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराकरीता फिरकला नाही. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करून त्यांना ताकद देणारा महाविकास आघाडीतील एकही बडा नेता मतदारसंघात प्रचारात न उतरल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज अमरावती येथे सभा घेत आहे. यवतमाळ येथे त्यांची सभा होईल, अशी चर्चा होती. पण त्यांचीही सभा झाली नाही.

आणखी वाचा-लग्नाचे निमित्त झाले अन्… पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नी व मुलीला संपवले

महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या भरवशावर निवडणूक लढली जात असताना महायुतीत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही सभा, रॅली, रोड शोचा धडाका सुरू आहे. आज मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेता गोविंदा, संजय राठोड हे दिग्गज दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी सभा, रॅली, रोड शो करत आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडाल्याचे चित्र आहे.

Story img Loader