नागपूर: हकालपट्टी करा.. हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा…, राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शने केली.

महाविकास आघाडीच्या आमदारांकडून बुधवारी संत्री घेऊन तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.. म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. याप्रसंगी आमदारांनी हातात खेळण्याचे मांजर आणि बोके व खाली खोके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरू झालयं. आजही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक घोषणा दिल्या. . शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका.. विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका, महाराष्ट्राला धोका… मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Satyajeet tambe and vishal patil
सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, सत्यजीत तांबेंचं भूमिकेला समर्थन; काँग्रेसला सल्ला देत म्हणाले, “अजूनही…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

हेही वाचा: अरे बापरे मला रात्रभर झोप लागेना; बावनकुळेंच्या विधानावर अजित पवार यांचा टोला

या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, रोहित पवार, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, सुनील केदार, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

हेही वाचा: … म्हणून अजित पवार काल सरकारी विमानातून नागपुरहून मुंबईला गेले

याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाहीत. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेवून प्रतिकात्मक आंदोलन केले आहे.