चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या दृष्टीने तब्बल ५५ वाघांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्याचा विक्रम पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केला आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प असो की चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल, येथे मागील १५ वर्षांपासून मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात शेकडो लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी डॉ. खोब्रागडे आणि त्यांच्या चमूने आतापर्यंत ५५ वाघांना बेशुद्ध करून जेरबंद केले.

हेही वाचा – महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ पुतळ्याच्या वादाचे नागपुरात पडसाद, काय घडले?

उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१६ मध्ये डॉ. खोब्रागडे यांना शासनाकडून जागतिक स्तरावरील ‘सेंच्युरी एशिया जॉईंट वाईल्डलाईफ सर्विस अवॉर्ड’ने गौरवण्यात आले. त्यांच्यावर आतापर्यंत वाघ तथा बिबट्यांनी अनेकदा हल्लेदेखील केले. या हल्ल्यात ते अनेकदा जखमी झाले. मात्र, त्यांनी आपले काम थांबवले नाही. हत्तींसाठी कर्दनकाळ ठरलेल्या हरपीज विषाणूचा शोधही त्यांनी लावला आहे.