नागपूर : शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी वाडी, अंबाझरी, आयटी पार्क, महाराजबाग परिसर आणि एवढेच नव्हे तर शहराच्या आत तब्बल आठ दिवस बिबट्याने मुक्काम ठोकला होता. तर आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाजवळील निवासी भागात बिबट्याने दर्शन दिले.

पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ला केला. झिंगाबाई टाकळी रस्त्यावरील उच्चदाब वीज वाहिनीच्या मनोऱ्यापासून ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. या घटनास्थळापासून गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसर अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. सावंत सोसायटीत रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील एका तरुणाने बिबट्याला पाहिले, असे त्याचे म्हणणे आहे. बिबट्या दिसल्याच्या वृत्तानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी त्या बिबटयाचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो हाती लागला नाही. स्थानिकांनी याप्रकरणी लगतच्या पोलीस ठाण्यात ही माहिती दिली आणि पोलीसांनी यासंदर्भात वनविभागाला कळवले. वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी ते ‘सर्च ऑपरेशन’ राबवत आहेत. गोरेवाडा परिसरात बिबट्याचा वावर नवा नाही. गोरेवाडा बचाव केंद्र आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय होण्याआधीपासूनच येथे सुमारे १२ ते १४ बिबट्यांनी अधिवास म्हणून हे क्षेत्र निवडले होते, पण हेच बिबटे आता जाता-येता नागरिकांना दर्शन देवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकही आता ‘सातच्या आत घरात’ असे म्हणून अंधार पडण्याआधीच घराकडे धाव घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी एक बिबट चक्क गोरेवाडा जुनी वस्ती जवळच्या सुरक्षा भिंतीवरून चक्क येरझारा घालत होता. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात बिबट्यांची सफारी आहे, पण ज्या गोरेवाडा परिसरात हे प्राणिसंग्रहालय आणि बचाव केंद्र आहे, त्या परिसरात बिबट मोठ्या संख्येने आहेत.

Congress Leader P N Patil
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
Nagpur smart prepaid meters marathi news
नागपूर, वर्धेत स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवणे सुरू; ग्राहकांच्या मनस्तापाचे…
Lok sabha election Bhandara Gondia Excitement about voting in Sakoli
मतप्रवाहाचा मागोवा: साकोलीतील मतदानाबाबत उत्कंठा
akola city recorded as hottest in vidarbha temp reaches 44 8 degrees celsius
नवतपाच्या आगमनाला वेळ, पण विदर्भ तापू लागला; सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात
Loksatta editorial Drought situation in Maharashtra Farmer suicide
अग्रलेख: सतराशे लुगडी; तरी..
anand ingale reaction on growth of marathi cinema
“घाणेरडी कॉमेडी करून गलिच्छ सिनेमा करायचा”, आनंद इंगळेंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “तो विशिष्ट काळ…”
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
monsoon vidarbha marathi news
विदर्भात मोसमी पाऊस केव्‍हा दाखल होणार? हवामान तज्‍ज्ञांनी सांगितले…

हेही वाचा >>>संघाकडून प्रशिक्षण वर्गात बदल…..आता तृतीय संघ शिक्षा वर्ग नव्हे तर…….

सहज वावर

अलिकडे नागपुरात वाघ आणि बिबट्यांचा प्रवेश सहज होत आहे. हिंगणा, वानाडोंगरी, इसासनी, बुटीबोरी एमआयडीसीत वाघ, बिबट दिसणे नवीन नाही. नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या दाट लोकवस्तीच्या वाडी परिसरात यापूर्वीही बऱ्याचवेळा बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने अनेक दिवस उपस्थिती दर्शवली. तर अमरावती महामार्गावरून दाभाकडे जाणाऱ्या झाडी झुडुपाच्या रस्त्यावर दोनेक वर्षापूर्वी बिबट्याला पाहिल्याची चर्चा होती. वाडी परिसराला लागून असलेल्या एमआयडीसीमध्येही अनेकांना रात्रीच्या वेळेस बिबट्याचे वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिल्यांदा बिबट परिसरातील दाट झाडीत मार्गक्रमण करताना दिसतो. त्यानंतर तोच बिबट डेपोच्या भिंतीवर चालताना दिसला होता.