लोकसत्ता टीम

गोंदिया: देवरी तालुक्यातील ग्राम शेरपार तसेच जवळील परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेरपार तसेच जनतेमध्ये परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्या घुसण्याची तक्रार वन विभागाला गावातील लोकांनी सांगितले असून, वनविभागाने दिवस आणि रात्रीच्या पहारात वाढ केली आहे.

water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Water scarcity in Jalgaon district
निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचे संकट; ३१ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी
leopard spotted in kinhavali
शहापूर जवळील किन्हवली खरांगण परिसरात बिबट्याचा संचार

सविस्तर असे की, देवरी तालुका घनदाट जंगलाने व्यापले असून, या भागात वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी पाहायला मिळतात. परंतु, वर्तमान स्थिती पाहता, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने प्राण्यांच्या वस्तीकडे मोर्चा वळविलेला असल्यामुळे जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर जात आहेत. कित्येक ठिकाणी जंगले विरळ झाले आहेत. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जंगली प्राण्यांपेक्षा गावातील पाळीव प्राण्यांची शिकार सुलभ होत असल्यामुळे जंगलातील प्राण्यांना गावातील पाळीव प्राण्यांचे जास्त आकर्षण वाटत असल्यामुळे वन्यप्राणी शिकारीच्या शोधात गावामध्ये प्रवेश करत असतात . हीच परिस्थिती देवरी तालुक्यातील शेरपार तसेच जवळील परिसरातील असून, मागील आठ दिवसांपासून शेरपार वस्तीलगत बिबट्याचे मुक्काम वाढले आहे.

आणखी वाचा-नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-१ वाघीण सह दोन बछड्यांचे दर्शन

या बिबट्याने गावातील एका कुत्र्याची तसेच शेळीची शिकार केली आहे. त्याचप्रमाणे गावातील एका व्यक्तीवरही हल्ला केला आहे. त्यामुळे शेरपार तसेच आजूबाजूच्या परिसरातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामूळे सायंकाळ झाली की, या परिसरातील लोक घराचे दार बंद करून घरात असतात. या घटनेची माहिती देवरी वन विभागाला मिळाली असता, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा बिबट कैद झालेला आहे. यामुळे देवरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस बिबट्याच्या पहारात वाढ केली आहे. तसेच शेरपार आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.