भंडारा : शिकारीच्या शोधात जंगलातून थेट शेत शिवारात आलेला एक बिबट रात्रीच्या सुमारास सरांडी (बु.) येथील शेतातील एका विहिरीत पडल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लाखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने अथक परिश्रम करून बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

हा बिबट अंदाजे दीड वर्षे वयाचा होता. सरांडी (बू) येथील रमेश गणपत राऊत यांच्या शेतातील विहिरीत बिबट पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट जिवंत असल्याची खात्री होताच वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी घटनेची माहिती साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना देत वन्य जीव बचाव पथकाची मागणी केली.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

हेही वाचा – वीज दरवाढीने जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी राजकारणात व्यस्त! विद्युत नियामक आयोगाच्या सुनावणीकडे पाठ

हेही वाचा – मुंबई बाहेर जाण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख पुन्हा न्यायालयात

गोंदिया वन विभागाच्या वन्य जीव बचाव पथकाच्या चमूने घटनास्थळी दाखल होवून पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जीवनदान दिले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.