लोकसत्ता टीम

यवतमाळ : भक्षाच्या शोधात भ्रमंती करीत असलेल्या बिबट्याला नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदणी घाटात अज्ञात वाहनाने जोदार धडक दिली. या अपघातात बिबट जागीच ठार झाला.

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Arrest for vandalizing vehicles in Kasba Peth pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणारे गजाआड; दोन अल्पवयीन ताब्यात
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना

ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आर्णी तालुक्यातील कोसदणी घाटात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृत बिबट्याला आर्णी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. उत्तर आर्णी परिक्षेत्रातील लोणबेहळ बिट कक्ष क्रमांक ११ मध्ये अंदाजे चार ते पाच वर्षाचा बिबट भ्रमंती करत होता. तो रस्ता ओलांडत असताना नागपूर-तुळजापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बिबट जागीच ठार झाला.

आणखी वाचा-व्यापारी गुजरातचा, अपहरण मलकापुरातून अन् आरोपी मराठवाड्यातील!

या घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक दादासाहेब तौर, वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे, क्षेत्र सहाय्य्क विश्वंभर जाधव, वनसंरक्षक गौतम बरडे, निलेश चव्हाण, आकाश मोरे, उद्धव बुद्धवंत, लक्ष्मण भिसे, पुंडलिक खत्री, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण आडे, पोलीस कर्मचारी अतुल पवार, जमादार अरुण पवार, मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी, सतीश इंगोले वनरक्षक, विनोद मस्के, मयूर पाळेकर, संतोष राठोड, संजय माहूरकर, प्रदीप भिमटे, कामेश भोयर, अतुल येनेवार, रामकृष्ण लांडे, लोणबेहळ येथील पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळ गाठले.

वनअधिकाऱ्‍यांनी पंचनामा करुन मृत बिबट्याचे पार्थिव आर्णी वनपरीखेत्र कार्यालयात पाठविले. नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसदणी घाटात यापूर्वीही वन्यप्रांण्यांचा अपघातात मृत्यू झाल आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा जंगल असल्याने वाघ, बिबट, अस्वल, कोल्हे, हरीण आदी वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. मात्र रात्रीच्या वेळी हे वन्यप्राणी रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांमुळे ठोकरले जावून मृत्यूमुखी पडत आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या येण्या-जाण्याकरीता कॅरिडॉर निर्माण करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

आणखी वाचा-विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील संघटना नागपुरात येणार… हे आहे कारण…

‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन

अन्नाच्या शोधात भ्रमंती करीत असलेल्या बिबट्याला कोसदणी घाटात बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरूण बिबट्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पंचनामा करून आज, गुरूवारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहरे व डॉ अरुण आडे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर लोणबेहळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही र्व प्रक्रिया ‘इनकॅमेरा’ करण्यात आली. यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Story img Loader