scorecardresearch

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप

अकोला जिल्हा बाल कल्याण अधिकाऱ्यांना एक अल्पवयीन मुलगी १४ मे २०१९ रोजी भीक मागताना दिसून आली होती.

20 year old girl raped by two laborers
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अकोला : अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नराधमाला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अकोला जिल्हा बाल कल्याण अधिकाऱ्यांना एक अल्पवयीन मुलगी १४ मे २०१९ रोजी भीक मागताना दिसून आली होती. या मुलीला त्यांनी गायत्री बालिकाश्रमात दाखल केले होते. त्यानंतर पीडितेच्या आईने तिचा ताबा घेतला. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडितेला वेदना होत असल्याने तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा >>> ‘या’ गावात आहे धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा; साकडं पूर्ण करण्यासाठी भक्त करतात ‘अग्निदिव्य’

तेथे तिने वडिलांनी तिच्यावर अत्याचार करून धमकावल्याचे सांगितले. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी सावत्र बापाविरूद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा भाेगावी लागणार आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शितल भुतडा यांनी सरकारच्यावतीने कामकाज पाहिले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:07 IST
ताज्या बातम्या